मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत- स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धेत आडवली हायस्कूलच्या विद्यार्थांनी यश मिळविलेआहे.
केंद्रस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
वक्तृत्व स्पर्धा- (इयत्ता ५वी ते ७वी- लहान गट)
तृतीय क्रमांक- अथर्व विद्याधर तुळपुळे.
( इयत्ता ८ वी ते १०वी-मोठा गट) प्रथम क्रमांक- कु.सिद्धी अरविंद साटम (१०वी) , द्वितीय क्रमांक- कु.सोनम संदीप घाडीगांवकर.(९वी.)
निबंध स्पर्धा- ( इयत्ता८ वी ते १०वी-मोठा गट)
प्रथम- कु.अनुष्का अनिल तांडेल.(१०वी.),द्वितीय- कु.ऋतुजा सुरेश मेस्त्री.(८वी.). (इयत्ता ५ वी ते ७ वी -लहान गट )द्वितीय क्रमांक -वैष्णवी हेमंत घाडीगावकर ( ७वी )
चित्रकला स्पर्धा-
(इयत्ता ५वी ते ७वी- लहान गट) प्रथम-कु.संपदा गोपाळ मेस्त्री.(७वी). ( इयत्ता ८ वी ते १०वी-मोठा गट)प्रथम क्रमांक- कु.दीक्षा संतोष चिंदरकर. (इयत्ता १०वी.). केंद्रस्तरावर यश संपादन करून तालुकास्तर स्पर्धेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थांचे मुख्याध्यापक श्री.सकपाळ सर व सर्व शिक्षक गुरुजन वर्ग यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे संस्था अध्यक्ष,तसेच सर्व संस्था पदाधिकारी,सदस्य.अध्यक्ष,शाळा समिती,शाळा समिती पदाधिकारी,सदस्य,तसेच सर्व निमंत्रित सदस्य आडवली.प्रशालेचे मुख्या, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.