शिरगांव / संतोष साळसकर :
प्रामुख्याने मोकाट गुरे, सांडपाणी ,ड्रेनेज याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी येऊन देखील त्यावर योग्य ती ठोस कारवाई प्रशासनामार्फत केली जात नाही. त्याचप्रमाणे सन २०१९ पासून अनेक तक्रारी ह्या अद्यापही सोडविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. आयत्या वेळीच्या चर्चेत चर्चिले जाणारे सर्व विषय पुढील सर्वसाधारण सभेत विषय पटलावर यावेत व त्यावर योग्य ती कारवाई कोणत्या स्वरूपाचे करण्यात आली याची माहिती सभागृहात देण्यात यावी ती माहिती वेळवर दिली जात नाही .अशी खंत आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर यांनी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केली. देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पार पडली. या सभेला आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर उपनगराध्यक्ष मिताली सावंत बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी, पाणी पुरवठा समिती सभापती संतोष तारी मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी इतिवृत्ताचे वाचन होत असताना यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत फेज १ मध्ये व फेज २ मध्ये बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट पोल बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी करूनही त्याबाबत योग्य ती माहिती देण्यात आली नाही याबाबत नगरसेविका प्रणाली माने यांनी नाराजी व्यक्त केली देवगड जामसंडे नगरपंचायत ह्द्दीतील समस्या बाबत प्रशासनाकडे वारंवार अनेक विषयावर चर्चा करून देखील प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याबाबत नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरसेविका अरुणा पाटकर प्रणाली माने,नितीन बांदेकर,तन्वी चांदोस्कर, आर्या गुमास्ते यांनी नाराजी व्यक्त केली. नगरपंचायत कार्यालय नजिकच्या निरलेखितशित करण्यात आलेल्या इमारती रास्त दराचे धान्य दुकान असून या इमारती मधून नागरिकांना धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असे विचार नितीन बांदेकर यांनी करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना केली. या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने देवगड नगरपंचायत मालकीच्या शासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामाकरिता संगणक प्रिंटर झेरॉक्स मशीन इत्यादी साहित्य खरेदी करण्याबाबत सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर झेंडा या उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे या सभेत ठरले. विकास कामाबाबत चर्चा होत असताना देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ नगरसेविका अरुणा पाटकर यांनी सुचविलेल्या विकास कामांमधील श्रीकृष्ण नगर येथील नाचणकर घर ते श्रीकृष्ण मंदिर रस्ता अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे त्याचबरोबर त्याचबरोबर श्रीकृष्ण नगर येथील योगेश जोशी घर हे अनिल आपटे यांच्या घरापर्यंत खोदाइ करून आरसीसी बंदिस्त गटार करणे या कामांच्या निवडी बाबत चर्चा करण्यात आली .देवगड जामसंडे कार्यक्षेत्रातील श्रीकृष्ण नगर येथील म्हादनाक यांच्या प्लॉट ते म्हादनाक यांच्या घरपर्यंत आरसीसी बंदिस्त गट करणे. प्रभाग क्रमांक १४ मधील आनंदनगर सोहनी वाडी धोपटेवाडी, श्रीकृष्ण नगर ,येथे हाय मास्ट बसविणे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १४ मधील लघूनळयोजना विस्तारित करणे, गणेश नगर येथील नगरपंचायत गार्डन ते सुहास गोगटे घरापर्यंत खोदाई करून आरसीसी बंदिस्त गटार करणे या कामाची निवड निश्चित करून विचार विनिमय या सभेत करण्यात आला. गणेश नगर येथील सुहास गोगटे घर ते तळगावकर घरापर्यंत खोदाई होत करून आरसीसी बंदिस्त गटार करणे प्रभाग क्रमांक १४ मधील नंदू मोरे घर ते धोपटेवाडी भिडे घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, जामसंडे भिडे भटवाडी ते राम मंदिर रस्ता या विकास कामाबद्दल या सभेत चर्चा करण्यात आली.या वेळी सर्व प्रभागांना विकास कामांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना नितीन बांदेकर,प्रणाली माने यांनी केली.
आयत्या वेळेच्या चर्चेत नागरिकांना अत्यावश्यक असलेली घंटागाडी गेली चार महिने बंद असून त्याबाबत माहिती देण्यांत यावी.तसेच ग्रास कटर बाबत माहिती मिळावीअशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली.घंटा गाडीची मागील दुरुस्ती बिल न दिल्याने ती संबंधित गॅरेज मधून झालेली नाही असे सांगताच नगराध्यक्षा मानधन घेतात तर जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का होते अशी विचारणा नगरसेविका चांदोसकर यांनी करताच नगराध्यक्षा साक्षी प्रभू भडकल्या .या पूर्वी सर्वत्र या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यानी येणे बाकी केल्याने या समस्या निर्माण होत असून प्रसंगी आताचे काही सत्ताधारी स्वखर्चातून काही समस्या मार्गी लावत असल्याचे संतोष तारी, विशाल मांजरेकर बुवा तारी यांनी सांगितले.मानधन व मानापमान नाट्य मात्र या सभेत नगराध्यक्षा व नगरसेविका यांच्यात रंगले .या वर नगरसेविका प्रणाली माने यानी अवांतर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी स्वनिधी मधून समस्या मार्गी लावाव्यात अशी सूचना केली व वादावर पडला पडला.या सभेत मागील थकीत बिलांचा उहापोह देखील करण्यात आला.गणेश उत्सव पूर्वी प्रभाग निहाय स्वछता अन्य विसर्जन स्थळी कोणत्या प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात यावी अशी सुचना प्रणाली माने यांनी केली. गणेश उत्सवापूर्वी सर्व स्ट्रीट लाईट हाय मास्ट सुरू करण्यात यावे अशी सूचना तन्वी चांदोस्कर,अरुणा पाटकर आर्या गुमास्ते यांनी केली.
देवगड येथील स्मशान भूमी बाबत संबंधित मक्तेदारांना सभागृहात पाचारण करण्यात येऊन रेंगाळलेल्या कामाबाबत विचारणा केली असता मागील चालू कामाची धावते बिल अदा करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली त्यावर सदस्यांनी त्यांचेकडून मुदत मगितली.यावर आवश्यक ती माहिती इंजिनिअरशी चर्चा करून घेण्याचे ठरले.