मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले ( मालवण) येथील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सकाळी नित्योपासना, अभिषेक शडोपंचारे पूजा, आरती तिर्थप्रसाद, सामुदायिक नामस्मरण, हरिपाठ, व भजने असे विविध कार्यक्रम पार पडले. वेळेचे योग्य नियोजन व शिस्त या करिता या स्थानाला महत्व आहे.

आध्यत्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी मठाधिपती श्री गणेश घाडीगांवकर राबवित असतात. शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.