अभंगवाणीने रसिक मंत्रमुग्ध.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ .नाथ पै सेवांगण कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त कट्टा एसटी स्टँड ते विठ्ठल मंदिर येथे दिंडी काढण्यात आली.कट्टा परिसरातील कट्टा गुरामवाडी व कुणकवळे शाळेतील मुले व महिला पालक सहभागी झाले होते.कुमार श्राव्य झाटये याने साकारलेला विठूराया, कुमारी तनिषा म्हाडगुत यानी साकारलेली मुक्ताई साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

कुणकवळे येथील मुलानी खास वारकरी पेहराव केला होता. पाऊस असूनही मुले उत्साहाने व आनंदाने नाचत असल्याचे दृश्य दिसून आले.पेंडूर येथील प्रसिद्ध गायक व कला दिग्दर्शक भारत पेंडूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभंग गायनाचा शुभारंभ झाला.

भारत पेंडूरकर यानी गायलेल्या गणेश वंदनाने सुरुवात झाली.गीता नाईक यानी “अमृताहुनी गोड” व “धरीला पंढरीचा चोर”हे अभंग,मिथीला नागवेकर यानी “सुंदर ते ध्यान व वृक्षवल्ली अम्हा सोयरी” हे अभंग, वैष्णवी लाड यानी “विठू माऊली तू ” प्रियांका भोगटे यांनी”चद्रभागेच्या तिरी ” दीपक भोगटे यानी “कानडा राजा पंढरीचा”नांदोसकर गुरुजी यांनी ” मुकेपणा आज माझा ” हे अभंग गायन केले.भारत पेंडूरकर यांनी सामुदायीक पणे गायलेल्या जय जय रामकृष्ण हरी याभजनाने व त्यानंतर सुजाता पावसकर यांच्या पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.बाळकृष्ण गोंधळी व सुजाता पावसकर यांनी दिंडी व अभंग गायन याचे संपूर्ण नियोजन केले.या उपक्रमात किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर,अरविंद शंकरदास, भारत पेंडूरकर अरविंद पेंडूरकर, श्री पवार,
मिथिला नागवेकर, वैष्णवी लाड, गीता नाईक, प्रियांका भोगटे,
स्नेहा पावसकर, धुत्रे बाई, मधुरा माडये, गौरी झाट्ये, संदेश वाईरकर, शिवणकला विभागाच्या विद्यार्थिनी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.