29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

करूळ-भुईबावाडा घाट यापुढे बंद झाल्यास अधिकाऱ्यांची माझ्याशी गाठ; खड्ड्यामुळे अपघात घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार – आमदार नितेश राणे.

- Advertisement -
- Advertisement -

वैभववाडी | प्रतिनिधी : करूळ व भुईबावडा घाट मार्ग यापुढे बंद झाला किंवा रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात झाला तर अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे. जनतेचे आपण सेवेकरी आहोत, यापुढे कामात चालढकलपणा, आळस चालणार नाही. कारणे चालणार नाहीत. कामे जमणार नसतील तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, बदली करून घ्यावी. आम्ही दुसरे अधिकारी नियुक्त करतो. पण यापुढे अधिकाऱ्यांची नाटकं खपवून घेणार नाही. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे आढावा बैठकीत केला. राज्यात आता नवीन सरकार स्थापन झाले आहे. तालुक्याच्या विकास कामात निधी देण्यास कमी पडलो तर जबाबदार मी. निधी देणे जबाबदारी माझी. मी कारणे देणार नाही. तुम्हीही कारणे मला सांगायची नाहीत. असे नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नगराध्यक्ष नेहा माईनकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसीलदार श्रीमती कासकर, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नवलराज काळे, बंड्या मांजरेकर व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला आमदार नितेश राणे यांनी करूळ व भुईबावडा घाट मार्गांची परिस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यापुढे घाट बंद असा विषय होता नये, त्याचबरोबर तालुक्यातील रस्त्यातील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत, सर्व रस्ते निर्धोक करा. रस्त्यासाठी निधीची मागणी करा. निधी देण्याची जबाबदारी माझी. अधिकाऱ्यांनी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. आता नवीन सरकार आले आहे. जनतेच्या अपेक्षा या सरकारकडून खूप आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता वाढली आहे असे सांगितले. वैभववाडी शहरातील गटारांबाबत अधिकाऱ्यांना श्री राणे यांनी धारेवर धरले. गटार मारताना तक्रारी येत असतील तर संबंधित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना विश्वासात घ्या. मनमानी कारभार कोणीही करायचा नाही अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यात चोरीच्या घटना वाढत आहेत. यापुढे खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे अशा सूचनाही पोलीस निरीक्षक अमित यादव यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या. तहसील कार्यालयात मनमानी कारभार चालू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नायब तहसीलदार श्रीमती कासकर या दाखले देण्यास अडवणूक करत आहेत, विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत, त्यांची तात्काळ कार्यालयातून उचलबांगडी करा. अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. नवीन पंचायत समिती इमारतमधील उर्वरित कामे तात्काळ काम पूर्ण करा, जुलै अखेरपर्यंत इमारत पूर्ण करा असे राणे यांनी सांगितले. तालुक्यातील जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यांवरील झाडी व खड्डे भरण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!