25.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मडुरा गावातील वीज समस्या बाबतचे ग्रामस्थांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा गावात वीज समस्यांचा डोंगर उभा राहिला असून याकडे वायरमन, लाईनमन, बांदा अधिकारी तसेच सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. अपघात होऊन विद्युत वाहिनी तुटल्याची कल्पना दिल्यानंतरही कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहत नसल्यामुळे हानी झाल्यास जबाबदार कोण व मागणी करूनही कामे रेंगाळलेली असतात, वीज अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल करत उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र उपस्थित केलेल्या सर्व मागण्या दहा दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत माधव यांनी सांगितले.

उपोषणास उपस्थित मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सातोसे सरपंच बबन सातोस्कर, माजी सरपंच आबा धुरी, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, ग्रा.पं.माजी सदस्य प्रकाश वालावलकर, तसेच तातो शेर्लेकर, नितीन नाईक, प्रकाश सातार्डेकर, बाळू गावडे, दाजी सातार्डेकर, संतोष जाधव, पिंट्या परब, मोहन गवस, दिनेश नाईक, सुधीर नाईक,साहिल माधव, तेजा शिरोडकर, संतोष परब, रामा परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मडुरा गावात सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. कास मंगळमोड जंगल भागातून जाणाऱ्या मेन लाइनवर झुडपे वाढलेली आहेत. सातार्डातून पर्यायी वीजपुरवठा तसेच रोणापाल ते माऊली मंदिर दरम्यान मेन लाईन जोडणी कामात आम्हाला केवळ तोंडी आश्वासने दिली जातात व त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे सांगत तात्या माधव आक्रमक झाले.
नैसर्गिक आपत्तीत आम्ही ग्रामस्थ वीज वितरणला कायम सहकार्य करत असतो. डिगवाडीतील विद्युत वाहिनीवर पूर्णपणे झाडी आहे. भरमसाट आलेली वीज बिले आम्ही नेहमी वेळेवर भरतो मात्र ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्यांकडे उपकार्यकारी अभियंता यांचाच लक्ष नसल्याचा आरोप मडुरा ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश वालावलकर यांनी केला.
उपसरपंच विजय वालावलकर म्हणाले की, मडुरा तिठ्यावर लाइनमन यांना एक कार्यालय उघडून द्या. कारण वीज समस्यांसंदर्भात लाईनमन कधीही मडुरा गावात फिरत नसल्याचे ते म्हणाले.
सातोसेत वीज अपघात होऊन मनुष्य हानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सातोसे सरपंच बबन सातोस्कर यांनी केला.
दरम्यान, सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता श्री. घुरे व बांदा सहायक अभियंता अनिल यादव यांनी वीज संदर्भात ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी बांदा पोलीस तैनात करण्यात आले होते. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, मडुरा उपकेंद्राच्या डॉ. माजगावकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शेकडो ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!