चिंदर | विवेक परब :
मार्च 2022मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रशाळेचा सलग 100% निकाल लागला आहे.49 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यात सर्व प्रथम कु. प्राची संभाजी घाडीगावकर. हिला 91टक्के,द्वितीय कु. प्राची सखाराम घाडीगावकर हिला 89.60 टक्के तर तृतीय कु.पलक घनश्याम घाडीगावकर 89.20 टक्के.
32 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये पास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्याचे, पालकांचे,मुख्याध्यापकांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.श्री वासुदेव प्रभुदेसाई, उपाध्यक्ष श्री. सुभाष तळवडेकर, खजिनदार श्री. सदानंद वाघ, सचिव श्री. विष्णू मटकर, सर्व सदस्य अनुक्रमे श्री. रामचंद्र कामतेकर. श्री. मोहन घाडीगावकर, श्री. तातोबा घाडीगावकर, श्री. सुभाष धुरी, श्री. ज्ञानदेव जाधव, विजय कुवळेकर, श्री. नरेंद्र हाटले, श्री. घनश्याम चव्हाण, श्री. रामचंद्र घाडीगावकर, श्री. अभय प्रभुदेसाई, श्री. नरहरी परुळेकर यांनी सर्वांचे कौतुक केले.