26.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

” परिवार संवाद ” कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक वेंगुर्लेत भाजपा परिवारातील जुण्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार ; प्रसंन्ना देसाई , जिल्हा सरचिटणीस भाजपा..!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर/विवेक परब :
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ३० मे २०२२ रोजी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाचा कालावधी धरुन ८वर्षे पुर्ण झाली.
मोदी सरकारची कामगीरी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थांशी संपर्क साधुन लाभार्थ्यांची मते जाणून घेतली जात आहेत.
यासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री तसेच खासदार यांना आपला मतदारसंघ सोडून दुसर्या राज्यातील एक लोकसभा मतदार संघात जाऊन कार्यक्रम घेण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. या आवाहनाला साथ देत केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपादभाऊ नाईक हे दिनांक १२ व १३ जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. ह्या दोन दिवसात संघटनात्मक तसेच शासकीय कार्यक्रम आयोजित केले आहेत.
“परिवार संवाद कार्यक्रम”
सोमवार दिनांक १३ जुन रोजी दुपारी १:०० वाजता वेंगुर्ले शहरातील भटवाडी येथील भाजपाचे जुणे – जाणते पदाधिकारी रविंद्र शिरसाठ यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक हे भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये जनसंघापासुन ते आता भाजपा मध्ये असलेले कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी, अखिल भारतिय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, सागरी सीमा मंच, ग्रामविकास, शिक्षक परिषद, ग्राहक पंचायत, सहकार भारती इत्यादी परिवारातील मंडळीं उपस्थित रहाणार आहेत.
१९५२ ते १९८० या खडतर काळात ज्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जनसंघ व भाजपाची वाढ झाली अशा कार्यकर्त्यांच्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ” परिवार संवाद ” कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा लोकसभा प्रवास योजनेचे संपर्क प्रमुख प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर/विवेक परब :
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ३० मे २०२२ रोजी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाचा कालावधी धरुन ८वर्षे पुर्ण झाली.
मोदी सरकारची कामगीरी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थांशी संपर्क साधुन लाभार्थ्यांची मते जाणून घेतली जात आहेत.
यासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री तसेच खासदार यांना आपला मतदारसंघ सोडून दुसर्या राज्यातील एक लोकसभा मतदार संघात जाऊन कार्यक्रम घेण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. या आवाहनाला साथ देत केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपादभाऊ नाईक हे दिनांक १२ व १३ जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. ह्या दोन दिवसात संघटनात्मक तसेच शासकीय कार्यक्रम आयोजित केले आहेत.
"परिवार संवाद कार्यक्रम"
सोमवार दिनांक १३ जुन रोजी दुपारी १:०० वाजता वेंगुर्ले शहरातील भटवाडी येथील भाजपाचे जुणे - जाणते पदाधिकारी रविंद्र शिरसाठ यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक हे भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये जनसंघापासुन ते आता भाजपा मध्ये असलेले कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी, अखिल भारतिय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, सागरी सीमा मंच, ग्रामविकास, शिक्षक परिषद, ग्राहक पंचायत, सहकार भारती इत्यादी परिवारातील मंडळीं उपस्थित रहाणार आहेत.
१९५२ ते १९८० या खडतर काळात ज्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जनसंघ व भाजपाची वाढ झाली अशा कार्यकर्त्यांच्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी " परिवार संवाद " कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा लोकसभा प्रवास योजनेचे संपर्क प्रमुख प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

error: Content is protected !!