25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

‘अथक आमदार वैभव नाईक’ यांचा लोककलेचा आदर..! (विशेषवृत्त)

- Advertisement -
- Advertisement -

रात्री २ वाजता आमदार वैभव नाईक यांनी केले देवदर्शन आणि साजरा केला दशावतारी कलाकार दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील आस्थेची कला असलेल्या दशावतारात आदराचे व आघाडीचे असलेले मास्टर दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पोईप येथे रविवारी रात्री २ वाजता साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दादा राणे कोनसकर यांची प्रशंसा केली. त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्री देखील अथक आमदार वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकारासाठी वेळ दिल्याने दशावतारी कलाकारांवरील त्यांचे प्रेम व आदर पुन्हा अधोरेखीत झाले.

पोईप येथील श्री.देव वेताळ मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रविवारी रात्री उपस्थित राहून देव दर्शन घेतले. वर्धापन दिनानिमित्त लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा अजिंक्य तारा दशावतारी नाट्य प्रयोग सुरु होता. त्यादरम्यानच दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांना समजली. रंगमंचावर संगीतमय वादनाच्या साथीने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार वैभव नाईक हे नेहमीच दशावतारी कलाकारांना सहकार्य करतात याची आठवण करून देत दशावतारी नाट्यमंडळाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली .

यावेळी शिवसेनेचे पंकज वर्दम,शिवरामपंत पालव, बाळा सांडव, पोईप गावचे प्रमुख मानकरी परशुराम नाईक, दत्ताराम पालव, बबली पालव, गोपीनाथ पालव, विठ्ठल नाईक, श्री. तावडे, दशावतारी कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 च्या सामाजिक , सांस्कृतिक नियोजनावर गेले पंधरा दिवस अथक लक्ष दिलेले कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी एवढ्या व्यस्ततेतूनही ग्रामीण भागातील मंदिराच्या सोहळ्याला व लोककलावंतांना दिलेला वेळ सध्या कला व सामाजिक स्तरावर प्रशंसेचा विषय ठरत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!