कणकवली / उमेश परब : दळवी (भोसले)समाज हितवर्धक मंडळ,कळसुली आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्धा सत्कार सोहळा मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाला..
सदर कार्यक्रमात इयत्ता १० वी ,१२ वी कॉमर्स आणि आर्टस् मध्ये आलेले प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी तसेच गावातील सर्व दहावी आणि बारावी उत्तीर्ण दळवी समाजातील विद्यार्थी यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी इयत्ता १० वी,१२ वीतील एकूण २५ मुले पालकांसह उपस्थित होती.
तसेच या वेळी डॉ.मकरंद काजरेकर व श्रीम.सुवर्णा राणे (आरोग्य सेविका) यांचा कोरोना योद्धा म्हणून शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच गावचे माजी सरपंच श्री अतुल दळवी याना कर्नाटक,गोवा,महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या चार राज्यातील आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री अभय दळवी,कळसुली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री पुरुषोत्तम दळवी,स्कुल कमिटी चेअरमन श्री के.आर.दळवी, देव भोगनाथ सोसायटीचे चेअरमन श्री दिनकर दळवी,मंडळाचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व व्यासपीठावरील मान्यवारींनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री विश्वास दळवी व सुत्रसंचलन सचिव श्री प्रशांत दळवी यांनी केले.