पाडलोस सोसायटीची पहिलीच निवडणुक..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस सोसायटीच्या आठ जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत श्री देव रवळनाथ माऊली सहकार आघाडीचे आठ उमेदवार बहुमताने व एक उमेदवार बिनविरोध निवडून येत सोसायटीवर एकहाती सत्ता मिळविली.
पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीमुळे हा विजय ऐतिहासिक असल्याच्या प्रतिक्रिया जाणकार सभासद मतदारांमधून व्यक्त होत आहेत.
पॅनलप्रमुख तुकाराम शेटकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये लक्ष्मण बापू गावडे, राघोबा रामचंद्र गावडे, अर्जुन भिकाजी कुबल, आनंद गुंडू कुबल, सूर्यकांत वामन नाईक, विश्वनाथ अंकुश नाईक, गोविंद गणपत पराडकर, तुकाराम नवसाची शेटकर तर धनश्री पाडलोसकर यांनी बिनविरोध होत एकहाती सत्ता मिळविली.
श्री देव रवळनाथ माऊली सहकार आघाडीच्या विजयी उमेदवारांचे शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्या परब, जिल्हा परिषद माजी सदस्य राजन ऊर्फ राजू मुळीक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष डी. बी. वारंग, राजू शेटकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष मधुकर परब, सरपंच भाई भाईप’ महेश कुबल, समीर नाईक यांनी अभिनंदन केले.
यावेळी ग्रामस्थ आनंद गावडे,
लिंगाजी पाडलोसकर, रामचंद्र गावडे, सचिन गावडे, प्रदीप गावडे, गोविंद माधव, सुधीर गावडे, वासुदेव गावडे, चंद्रकांत पाडलोसकर, विठू गावडे, प्रणित गावडे, बंटी नाईक, निनाद शेटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विजयाचे खरे शिल्पकार उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचा जिल्हा बँक माजी अध्यक्ष डी.बी. वारंग यांनी विशेष सत्कार केला. तर मतदान केलेल्या सर्व सभासद मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानले.