25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

बांदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा |‍ राकेश परब : बांदा शहरातील उभाबाजार येथील प्रसिद्ध श्री दक्षिणाभीमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविकांना हा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करावा लागला होता. यंदा शनिवारीच हनुमान जन्मोत्सव आल्याने सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला .

शुक्रवारी  रात्री स्थानिकांच्या भजनसेवेने कार्यक्रम आरंभ झाला. त्यानंतर श्री स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ डेगवे यांचा “श्रीकृष्ण हनुमान युद्ध” हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. याला नाट्यरसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नाट्यप्रयोगा आधी होणारा  बालहनुमान दर्शनाचा प्रवेश गंधर्व धारगळकर याने केला. 

शनिवारी सकाळी शेकडो  भाविकांच्या उपस्थितीत श्री हनुमान जन्म सोहळा झाला.ह.भ.प.श्रीपाद पणशीकर बुवा यांनी जन्मोत्सवाचे कीर्तन केले. त्यानंतर वाजतगाजत
पारंपरिक श्री हनुमान फेरी काढण्यात आली. यंदा या फेरीसाठी हनुमान बनण्याचा बहुमान तेजस सुनिल येडवे या युवकाला मिळाला.
सायंकाळी श्री रामनाम जपाचे  तसेच  सायंकाळी  प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. लक्ष्मण नेवाळकर (कुडाळ) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री हनुमान सेवक मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा |‍ राकेश परब : बांदा शहरातील उभाबाजार येथील प्रसिद्ध श्री दक्षिणाभीमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविकांना हा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करावा लागला होता. यंदा शनिवारीच हनुमान जन्मोत्सव आल्याने सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला .

शुक्रवारी  रात्री स्थानिकांच्या भजनसेवेने कार्यक्रम आरंभ झाला. त्यानंतर श्री स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ डेगवे यांचा "श्रीकृष्ण हनुमान युद्ध" हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. याला नाट्यरसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नाट्यप्रयोगा आधी होणारा  बालहनुमान दर्शनाचा प्रवेश गंधर्व धारगळकर याने केला. 

शनिवारी सकाळी शेकडो  भाविकांच्या उपस्थितीत श्री हनुमान जन्म सोहळा झाला.ह.भ.प.श्रीपाद पणशीकर बुवा यांनी जन्मोत्सवाचे कीर्तन केले. त्यानंतर वाजतगाजत
पारंपरिक श्री हनुमान फेरी काढण्यात आली. यंदा या फेरीसाठी हनुमान बनण्याचा बहुमान तेजस सुनिल येडवे या युवकाला मिळाला.
सायंकाळी श्री रामनाम जपाचे  तसेच  सायंकाळी  प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. लक्ष्मण नेवाळकर (कुडाळ) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री हनुमान सेवक मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!