25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.
सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणण्यात आली.त्यानंतर संवस्तर पंचांग वाचन झाल्यानंतर मंदिरातील नंदीचौकावर श्री रामाच्या उत्सव मुर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला सुरुवात होते.मुर्ती प्रतिष्ठापनेनंतर दुपारी रामेश्वर मंदिराला रघुपती आरतीसह प्रदक्षिणा घातली जाते.

सायंकाळी माखन,दुपारी आणिसायंकाळी दरबारी गायन रात्रौ पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम ललितोत्सवापर्यंत चालतो.या वर्षी तेंडोली येथील ह भ प भास्कर बुवा मुंडले यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ आनंद लिंगायत व अभिषेक भालेकर करणार आहेत.
मागिल दोन वर्षे कोरोना महामारीमुळे उत्सव साजरा करण्याला बंधने आली होती. या वर्षी निर्बंध हटल्यामुळे उत्सव व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यामुळे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने या उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात बुधवार सहा व गुरुवार सात एप्रिल रोजी सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता कु सुधांशू सोमण यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार ८एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दिलीप ठाकूर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ भालचंद्र केळूसकर तर तबला साथ पंकज पाटील यांची होणार आहे .

दिनांक ९,१०,११ एप्रिल रोजी सकाळी दहा व सायंकाळी सहा या वेळी गोव्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गांवकर, आणि प्राची जठार यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना आँर्गन साथ हर्शल कटदरे तबला साथ प्रसाद करंबेळकर यांची लाभणार आहे. रविवारी रामजन्माचे किर्तन हभप ओंकार बुवा रामदासी यांचे होणार आहे.

मंगळवारी१२एप्रिल रोजी स्थानिक भजने तर बुधवारी जिल्हास्तरीय शुटिंग बाँल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार १५एप्रिल रोजी रात्रौ हनुमान जयंती निमित्त क्षितीज इव्हेंट प्रस्तुत तीन अंकी नाटक संगीत मत्स्यगंधा होणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!