29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महाविकास आघाडी विरोधात ८ मार्च रोजी मोर्चा.

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा कोकण प्रमुख प्रसाद लाड यांनी दिली माहिती.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : दहशतवादी हल्ल्यातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिक यांनी व मुलाने जमीन खरेदी केली,त्यात लाखों रुपयांचा घोटाळा केला. त्या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग मोठ्या प्रमाणात नवाब मलिक यांनी केले.मूळ जमीन मालकांच्या तक्रारी नंतर ईडीने अटक केली.नवाब मलिक यांना वाचवणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात मोर्चा आहे.भाजपाचा ८ मार्चला विधिमंडळावर लाखोंचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कोकण प्रमुख आ.प्रसाद लाड यांनी दिली.तसेच देवगड, कुडाळ या नगरपंचायत निवडणूक व पक्षांतर्गत कारवाई करणाऱ्या लोकांबद्दल आम्ही चिंतन करणार आहोत. भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, सरचिटणीस बबलू सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे,संदीप मेस्त्री,संदीप सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात आहेत.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झाली.त्यानंतर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे नेत्यांनी मोर्चे ,आंदोलने केली. परंतु या गुन्ह्यात ईडीने ९ ठिकाणी धाडी टाकले,दाऊदची बहीण हसीना पारकर व अन्य लोकांकडून ही जमीन घेतली,त्याचे जबाब झाले,त्यात मुबंई जमीन व्यवहार ८ हजार २५० रुपये बाजार भाव होता,तरी देखील कागदोपत्री व्यवहार ३० लाख दाखवले गेले. त्यात ३०० कोटीची फसवणूक झाली.ही जमीन परस्पर कुलमुखत्यार दाखवून विकली गेली .मूळ जमीन मालकांना पैसे मिळालेच नाहीत.जमीन विकत घेतली,त्याची चौकशी केली,30 लाख व्हाईट दाखवला गेला. हा पैसे गेला कुठे ?बॉम्बस्फोट झाला तिथे गेला का?,हैदराबाद मध्ये हल्ला झाला तिथे गेला का?असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही ,असे महाविकास आघाडी म्हणणं आहे. विकास आघाडी सरकार मंत्री नवाब मलिक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आ.प्रसाद लाड यांनी केला. हा जमीन व्यवहार २००३ मध्ये सुरु झाला,त्यानंतर २००५ मध्ये व्यवहार संपला.त्यावेळी केंद्र व राज्यात कॉग्रेस सरकार होते.बॉम्बस्फोट ६ ठिकाणी झाला त्याला हे पैसे लागले का? दाऊद इब्राहिम ने देशात अनेक कृत्य केली आहेत.त्याला खतपाणी कोण घालत होते? त्यावेळी काँग्रेस आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केला .

आमचे देशात सरकार आल्यानंतर आम्ही चौकशी आता आम्ही करत आहोत.मंत्र्याने दहशतवादी लोकांकडून जमीन खरेदी केली,त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. ईडीने जमीन मालकाची जबाब नोंदवले आहेत.शहावली खान,हसीना पारकर जवळ असलेले कुळमुखत्यार खोटं आहे.सगळी जमीन ३० लाखात जमीन घेतली.मग आता एका गाळ्याचे भाडे १ कोटी मिळत आहे.हा पैसा दहशतवादी लोकांकडे जात आहेत का? ईडीने करवाई केली ती योग्यच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार, खून,लूटमार, भ्रष्टाचार असे आरोप जनता सहन करत होती.महाविकास आघाडी सरकार दहशतवादी लोकांना साथ देत आहे.जोपर्यंत महाविकास आघाडी नाबाब मलीक यांचा राजीनामा घेत नाही,तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. जे नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे उपोषण केले,त्यांना लाज वाटली पाहिजे. साथ देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेध मोर्चा ८ मार्चला काढणार आहोत.सरकारने परवानगी नाकारली तरीही मोर्चा काढला जाईल, असा इशारा आ.प्रसाद लाड यांनी दिला. भाजपच्या नेत्यावर तक्रारी ईडी आहेत, त्यावर कारवाई होत नाही,अशी टीका आहे.जे दोषी असतील त्यावर कारवाई होईल.हे सरकार भाजपा नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आमचं तोंड बंद करण्याचा दबाव महाविकास आघाडी सरकार करत आहेत,असा आरोप आ.प्रसाद लाड यांनी केला. तसेच राज्यपाल यांनी केलेल्या शिवाजी महाराज यांच्या वक्तव्या बद्दल माफी मागितली, चूक झाली त्यामुळे पडदा पडला पाहिजे.राजे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत.हिंदू कार्यकर्ता म्हणून आम्ही सहन करणार नाही,असा इशारा आ.प्रसाद लाड यांनी दिला आहे. भाजपात जुना नवा वाद नाही… माझी कालच भाजपा कोकण प्रमुख म्हणून निवड झाली आहे.मला संपूर्ण खात्री आहे,सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे वाद नाहीत.जिल्हाध्यक्ष राजन तेली,मंत्री नारायण राणे,आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वात कुठे चूक झाली हे पाहू,बैठक लावून चिंतन केले जाईल.हा नवीन भाजपा आहे.त्यामुळे जुना नवा वाद नाही,असे बचावात्मक उत्तर आ.प्रसाद लाड यांनी दिले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!