मुणगे कॉलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : “या पुढील आयुष्यात अनेक परिक्षाना तुम्हाला सामोरे जायचे आहे. कुठल्याही परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. भविष्यात खूप मोठे यश मिळवा म्हणजे या संस्थेच्या वतीने प्रशालेत तुमचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळेल. चांगले माणूस बनतानाच या समाजाचे, शाळेचे आपण काही तरी देणे लागतो या विचाराने तुमच्या कॉलेज व प्रशालेला कधीच विसरू नका”, असे प्रतिपादन शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर यांनी येथे केले.
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व.विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथील बारावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, प्र मुख्याध्यापक प्रसाद बागवे, संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, सदस्य विजय पडवळ, प्रणय महाजन, झुंजार पेडणेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर, संतोष मुणगेकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. बारावीच्या विध्यार्थ्यांनी कॉलेज ला यावेळी भेटवस्तू दिल्या. सूत्रसंचलन प्रणय महाजन तर आभार सौ मिताली हिर्लेकर यांनी मानले.