29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महावितरणने केली बांदा आळवाड्यातील मागणी मान्य.

- Advertisement -
- Advertisement -

ग्रामपंचायत सदस्य जावेद ख़तीब यांच्या पाठपुराव्याला यश

बांदा | राकेश परब : बांदा आळवाडा येथील महावितरणच्या डी पी बॉक्स जागा बदलण्याच्या ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांच्या मागणीला यश आले आहे. पावसाळ्यात आळवाडा येथील डीपी बॉक्स सातत्याने पुराच्या पाण्याखाली येत असल्याने या भागातील नागरिकांना वीज समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पोलीस स्टेशन परिसरात पर्यायी डिपी बॉक्स बसविण्याची कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.
बांदा – आळवाडा परिसरातील महावितरणचा डिपी बॉक्स पावसाळ्यात सातत्याने पुराच्या पाण्याखाली राहतो. सदर डिपी बॉक्स पोलीस स्टेशन आवारात उंच भागात बसविण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांनी महावितरणकडे केली होती. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ अभियंता एस. आर. कोळे यांनी नुकतीच वस्तुस्थितीची पाहणी केली. या भागातील वीज ग्राहकांसाठी पोलीस स्टेशन परिसरात नवीन डिपी बॉक्स बसविणे आवश्यक असल्याचे अभियंता कोळे यांनी मान्य केले. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून लवकरच नवीन डिपी बॉक्स बसविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद ख़तीब, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलास आळवे, सुनील धामापूरकर, देवेंद्र भोगटे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बाजारपेठ येथील सुनील येडवे यांच्या दुकानच्या बाजूला असणारा विदयुत पोलवरील डीपी बॉक्स बदलावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ग्रामपंचायत सदस्य जावेद ख़तीब यांच्या पाठपुराव्याला यश

बांदा | राकेश परब : बांदा आळवाडा येथील महावितरणच्या डी पी बॉक्स जागा बदलण्याच्या ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांच्या मागणीला यश आले आहे. पावसाळ्यात आळवाडा येथील डीपी बॉक्स सातत्याने पुराच्या पाण्याखाली येत असल्याने या भागातील नागरिकांना वीज समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पोलीस स्टेशन परिसरात पर्यायी डिपी बॉक्स बसविण्याची कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.
बांदा - आळवाडा परिसरातील महावितरणचा डिपी बॉक्स पावसाळ्यात सातत्याने पुराच्या पाण्याखाली राहतो. सदर डिपी बॉक्स पोलीस स्टेशन आवारात उंच भागात बसविण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांनी महावितरणकडे केली होती. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ अभियंता एस. आर. कोळे यांनी नुकतीच वस्तुस्थितीची पाहणी केली. या भागातील वीज ग्राहकांसाठी पोलीस स्टेशन परिसरात नवीन डिपी बॉक्स बसविणे आवश्यक असल्याचे अभियंता कोळे यांनी मान्य केले. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून लवकरच नवीन डिपी बॉक्स बसविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद ख़तीब, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलास आळवे, सुनील धामापूरकर, देवेंद्र भोगटे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बाजारपेठ येथील सुनील येडवे यांच्या दुकानच्या बाजूला असणारा विदयुत पोलवरील डीपी बॉक्स बदलावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!