सुकृत जोशीचे नेतृत्व..
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये रंगणार्या “मालवण प्रिमीअर लीग 2022” साठी तारकर्ली क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामीण स्तरावर लेदर क्रिकेटचा उपक्रम राबविणारा तारकर्ली हा एकमेव संघ आहे .
कर्णधार सुकृत जोशीच्या नेतृत्वाखाली कागदावरचा हा बळकट संघ मैदानावरही खरा उतरेल ही तारकर्ली क्रिकेट क्लब चाहत्यांची खात्री आहे.
यंदाच्या तारकर्ली क्रिकेट क्लबच्या संघाला हाॅटेल मालवणी,सहदेव साळगांवकर,रामचंद्र चोपडेकर असे मुख्य प्रायोजक तर सहप्रायोजक म्हणून देऊलकर मसाले, मंगलमूर्ती स्कूबा डायव्हिंग, आदीआर्यन बिल्डिंग मटिरीअल सप्लायर्स अशी ख्यातनाम नांवे जोडली गेली आहेत.
तारकर्ली क्रिकेट क्लबचा संपूर्ण संघ पुढीलप्रमाणे आहे.
सुकृत जोशी (कर्णधार), गोविंद ऊर्फ बंटी केरकर , कुणाल केळुस्कर, सोहम मयेकर , रश्मीन रोगे, वैभव केळुस्कर, प्रशांत केळुस्कर, मितेश बांदेकर ,यश टेमकर ,सर्वेश धुरत , कल्पेश केळुस्कर (यष्टीरक्षक),कुणाल शिरोडकर, योगेश देऊलकर ,प्रतिक पाताडे ,सिद्धेश झाड.
स्टार स्टडेड फलंदाजी व गोलंदाजीची फळी असलेल्या या संघात स्विंगिंग सेन्सेशन व ऑलराऊंडर सोहम मयेकरच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
कुणाल केळुस्करच्या खेळाकडे चाहतावर्ग डोळे लावून असेल.
मालवण प्रिमीअर लीगच्या या मोसमासाठी तारकर्ली क्रिकेट क्लबने मैदानावरील कामगिरीसोबतच संघाच्या आधुनिक व काॅर्पोरेट रचनेलाही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा क्लब क्रिकेटसाठी एक नवीन आयाम दाखवून दिला आहे.