चिंदर ग्रामपंचायत सदस्यांना आय.पि.एस.केळकरांचे केले विशेष मार्गदर्शन..!
चिंदर / विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर ग्रामपंचायतीला गावचे आदर्श व्यक्तीमत्व आय. पी. एस. सुभ्रमण्य केळकर यांनी भेट दिली. सरपंच सौ. राजश्री कोदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. यानंतर बोलताना केळकर म्हणाले की आपल्या गावच्या भूमीतच शिक्षणाचे बॅकग्राऊंड तथा पार्श्वभूमी तयार व्हावी यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
काही वेळा यु. पी. एस. सी व एम. पी. एस. सी. व इतर स्पर्धा परिक्षा कधी होतात व त्यासाठी अभ्यास कसा करावा याची माहिती नसते. अशा परिक्षाच्या तयारी वा मार्गदर्शन करण्यासाठी आपण गावातील मुलांनसाठी तयार आहोत.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविस्तार अधिकारी युवराज चव्हान, ग्रामपंचायत सदस्य- महेंद्र मांजरेकर, पप्पू परुळेकर, दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, रिया घागरे, सानिका चिंदरकर, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, विश्राम माळगांवकर, दिगंबर जाधव उपस्थित होते.