मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ‘बॅरिस्टर नाथ पै सेवांगण,कट्टा’ येथे शिवजयंतीचे औचित्य साधत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे भास्कर आकेरकर यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिवरायांचे गुण अंगी बाणवा व निर्मय नागरीक बना असा संदेश त्यानी मुलाना दिला. दीपक भोगटे यानी बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने आयोजित स्पर्धांचा आढावा घेतला
वैष्णवी लाड यानी शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलाना सन्मान मिळत असल्याचा उल्लेख करुन शिवरायांच्या विचाराप्रमाणे वागणे हिच त्याना खरीखुरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले.
यावेळी प्राजक्ता चव्हाण यानी शिवरायांवरील एक गीत सादर केले.शिवण क्लासच्या विद्यार्थिनीनी शिवरायांवरील पथनाट्य सादर केले.
सेवांगणने आयोजित केलेल्या स्पधेतील कथाकथन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, पाढे लेखन, वाचन, वेशभूषा या स्पर्धातील २०० विजेत्याना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
वैष्णवी लाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी भास्कर आकेरकर,दीपक भोगटे, बापू तळावडेकर, डॉ.चेतन म्हाडगुत, चेतन मुसळे, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, शिवणक्लासच्या विद्यार्थिनी,गुणवंत विद्यार्थी, पालक उपस्थित होते.