मुंबई |ब्युरो न्यूज : शिक्षण विभागाने येत्या १७ ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता. परंतु मुलांचे लसीकरण पूर्ण न झाल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास टास्क फोर्स ने लगाम घातल्याने शाळा बंदच राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थित राज्यातील शाळा १७ ऑगस्ट पासून सुरू करण्याच्या निर्णयावर, काल उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागाचे अधिकारी, टास्क फोर्स चे सदस्य आणि काही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.