29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शैक्षणीक वाटचालीसाठी घरच्या परिस्थितीची सबब टाळण्याचे उद्योजक डॉ. दीपक परब यांचे आवाहन..!

- Advertisement -
- Advertisement -

ओझर विद्यामंदिरचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ‘ओझर विद्यामंदिर कांदळगांव’ या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मसुरे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने व दीपप्रज्वलनाने झाली.

परिस्थिती शिक्षणाच्या आड कधीच येत नाही. अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण परिस्थितीवरही मात करू शकतो हा स्वानुभवातून मिळालेला धडा समारंभाचे प्रमुख पाहुणे, उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मनोगतात व्यक्त केला. शाळेमध्ये राबविल्या गेलेल्या कौशल्याधिष्ठित उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून एखाद्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या ओझर विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कायम ठेव ठेवून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी रोख रकमेचे बक्षीस द्यावे, याकरिता दीपक परब यांनी वीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी संस्थेचे चिटणीस जी. एस. परब, खजिनदार शरद परब, सदस्य शांताराम परब, नंदकुमार राणे,माजी सभापती उदय परब, सरपंच उमदी परब, मिरी लागवड तज्ञ मिलिंद प्रभू, रवींद्र जोशी , शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय शेलटकर, विजय कांबळी, रणजित परब, राजेंद्र सुतार, मुख्याध्यापक प्रतापराव खोत, सौ. सुनीता साटम उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये मुख्याध्यापकांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख मांडला. शिक्षक अभय शेर्लेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करताना शाळेच्या वर्षभरातील विविध घटनांचा आढावा घेतला. त्यानंतर वर्षभरामध्ये यश संपादन केलेल्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ‘ याप्रसंगी मालवण तालुक्याचे माजी सभापती उदय परब, कांदळगावच्या सरपंच उमदी परब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, सदस्य नंदकुमार राणे, शालेय समिती सदस्य विजय कांबळी यांनी आपल्या मनोगताद्वारे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या हिरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या लॉटरी तिकीट विक्रीचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत पारकर, श्रावणी कांबळी, शेखर कांबळी, भाग्यश्री माळकर, विवेक रेवंडकर, शैलेश मेस्त्री, संजना कुराडे, दीपाली पारकर, संतोष राणे इ. माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे संपूर्ण नियोजन पी. के राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी, तर कु. रसिका मेस्त्री यांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओझर विद्यामंदिरचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील 'ओझर विद्यामंदिर कांदळगांव' या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मसुरे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने व दीपप्रज्वलनाने झाली.

परिस्थिती शिक्षणाच्या आड कधीच येत नाही. अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण परिस्थितीवरही मात करू शकतो हा स्वानुभवातून मिळालेला धडा समारंभाचे प्रमुख पाहुणे, उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मनोगतात व्यक्त केला. शाळेमध्ये राबविल्या गेलेल्या कौशल्याधिष्ठित उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून एखाद्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या ओझर विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कायम ठेव ठेवून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी रोख रकमेचे बक्षीस द्यावे, याकरिता दीपक परब यांनी वीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी संस्थेचे चिटणीस जी. एस. परब, खजिनदार शरद परब, सदस्य शांताराम परब, नंदकुमार राणे,माजी सभापती उदय परब, सरपंच उमदी परब, मिरी लागवड तज्ञ मिलिंद प्रभू, रवींद्र जोशी , शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय शेलटकर, विजय कांबळी, रणजित परब, राजेंद्र सुतार, मुख्याध्यापक प्रतापराव खोत, सौ. सुनीता साटम उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये मुख्याध्यापकांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख मांडला. शिक्षक अभय शेर्लेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करताना शाळेच्या वर्षभरातील विविध घटनांचा आढावा घेतला. त्यानंतर वर्षभरामध्ये यश संपादन केलेल्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ' याप्रसंगी मालवण तालुक्याचे माजी सभापती उदय परब, कांदळगावच्या सरपंच उमदी परब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, सदस्य नंदकुमार राणे, शालेय समिती सदस्य विजय कांबळी यांनी आपल्या मनोगताद्वारे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या हिरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या लॉटरी तिकीट विक्रीचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत पारकर, श्रावणी कांबळी, शेखर कांबळी, भाग्यश्री माळकर, विवेक रेवंडकर, शैलेश मेस्त्री, संजना कुराडे, दीपाली पारकर, संतोष राणे इ. माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे संपूर्ण नियोजन पी. के राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी, तर कु. रसिका मेस्त्री यांनी आभार मानले.

error: Content is protected !!