ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता.

प्रकाशन: 06 Dec 2024 03:03 PM
वाचन संख्या 90

आरबीआयने विनातारण कृषीकर्जाची मर्यादा वाढवली ; लवकरच परीपत्रक जारी होणार.

ब्यूरो न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा ही २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त १.६० लाख रुपये इतकी होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागणार नाहीये. याआधी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी काही गोष्टी गहाण ठेवाव्या लागत होत्या. परंतु, आरबीआयने आता यामध्ये काही बदल केला आहे. विनातारण शेतकऱ्यांना मिळणार कर्जवाढत्या महागाईपासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या प्रकारच्या कर्जाची मर्यादा पूर्वी १.६ लाख रुपये इतकी होती. पतधोरण आढाव्याबाबत माहिती देत असताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आणि महागाई लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असं ते म्हणाले. आरबीआयने २०१० मध्ये कृषी क्षेत्राला कोणत्याही हमीशिवाय १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यामध्ये वाढ करून ती मर्यादा १.६ लाख रुपये इतकी केली. अशातच आता ही मर्यादा २ लाख रुपये इतकी केली आहे. याबाबतचे परीपत्रक लवकरच आरबीआय कडून जारी करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स