28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

ता माझ्यावांगडा आसा..! ( संपादकीय विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | संपादकीय विशेष : माननव नाय ते ठरावीक वॅलेंटाईन सप्त्यातले दिवस… ठीक आसा.
पण जीवनाचो दृष्य अदृश्य ‘किस डे’ साजरो करता करता आभार मानुचे रवता नये ना तिचे असा त्याका वाटता आणि भावनांच्या कृतज्ञतेचा चुंबन आपसुक काळजातना दिला घेतला जाता.!

“ता माझ्यावांगडा आसा…?”असो एक प्रश्न पडाचो काळ आसता.
ह्या प्रश्नाचा उत्तर जेव्हा,
“ता माझ्यावांगडा आसा…” अशा विधानात’ बदालता तो प्रपोज डे असो असता की रातभर झोपच नाय…!

दिवस सराकतत
शिक्षण वगैरे नायतर नोकरी धंद्यात सगळा लक्ष एकाच ठिकाणी एकवटता..
“ता माझ्यावांगडा आसा…”
आता ह्याच वाक्य जबाबदारीत बदालता.कामधंद्यात प्रगती करुची वाटता.
मित्र मैत्रीणींका वेळ देणासुद्धा जड होऊक लागता. वेळातवेळ काढून मित्रांबरोबर पार्टी वगैरे करताना एकेक मिनिट सुद्धा मोजताना खूप कायतरी गमावल्यासारखा वाटता.
मन खाऊक लागता आणि खयतरी मन ‘आपण तिका देवचो वेळ ह्या मित्रांका दिलंव’, ह्या अपराधी भावनेन म्हणतच असता की आपण असा करता नये कारण, “ता माझ्यावांगडा आसा…!”

काळ मोसम पकाडता.. म्हणजे वेग पकाडता. लग्नाबिग्नांत विघ्ना येवची चिन्हा दिसतत. तिच्या घरचे नायतर त्याच्याघरचे नात्याक स्विकारतीत की नाय ह्या चिंतेत एक आश्वासक इंधन वाक्य मात्र जीवनाची गाडी ढकलूक उपयोगी पडता…”ता माझ्या वांगडा आसा…!” लग्न होता आणि आपण खूप कायतरी मोठो पराक्रम करणार्या जगातील नेमक्या माणसात इल्याची भावना येता. दचकून जाग येवची गरज संपता. जीवनातले नवनवीन रंग आणि चवी अगदी सेवेक हजर वगैरे होतंत आणि एक वाक्य स्वतःच लाजत, मोहरुन मन बोलता…. “ता माझ्या वांगडा आसा.!”
लग्नाक काही काळ लोटता. जबाबदारे आणखी वाढतत उत्पन्न वगैरे वाढवचे, गुंतवणुक करुचे अनेक आर्थिक विचार मनाचो ताबो घेतत.. मनाच्या गोंधळात शरीराकडे दुर्लक्ष होता.. आणि ह्या तिच्या लक्षात येताच ती आपले पूर्वीचे खर्च, मागणे, हट्ट गुटाळून ठेवून नोकरी धंद्यात लक्ष घालता नायतर मदत तरी करता… आणि इतक्या करुनपण ताटात गरमागरम डाळभात वाढता तेंव्हा पोट भराच्या आधीच मन तृप्ततेचो ढेकर देवन म्हणता… “ता माझ्यावांगडा आसा..!”

आता पुढचे दिवस जातत….तिकापण दिवस जातत. भायरसुन खूश वाटणारी तो भुतुरसुन थोडो काळजीतच असता. नऊ महिने नऊ दिवस वगैरे संपल्यार ती आणखी कोणाकतरी जन्म देता.
त्याका बाळाचा त्वांड बघुच्या इतकोच आनंद, तिचो खूप दमलेलो हसरो चेहरो बघल्यार जा काय होता ना..!
ता त्याकाच कळता आणि हरवलेला त्याचा पाकिट सापडल्याच्या आनंदात त्याचा मन सरसरावन नाचता आणि इचार येता…’ता माझ्यावांगडा आसा….!’

मुलाबाळा मोठी होऊन वाढत आसतंत.
आता हो पण थोडो वायच थारावलेलो एक स्थीर माणुस बनता. त्याचे आई बाप ह्याका वायच घरात बरो वेळ देवक सांगतत.
‘तो मात्र कायम कामात, मोबायलात नायतर टि. व्ही. तच कशाक’,असो ते तगादो लावतत. त्याचा मन शाप इटामता आणि त्याका वाटता ,” ह्यांका वेळबिळ देवक त्याची काय गरज जेंव्हा ‘ती’ सगळा पार पाडता ना..”, म्हणजे तोच पार पाडत असता असाच त्याका वाटता कारण “ता माझ्यावांगडा आसा…!”

जा त्याचा ता तिचा..!
हो हिशोब करु शकणारी अंबानी त्याच्यात जलामलेलो असता. मुलाबाळांची शाळा त्याका मोठेपणाचो स्टेटस् सिबॉल वाटता. आपणाक जा मिळाक नाय त्याच्या दसपटीन तो त्यांका ओतता. खयल्यातरी कार्यक्रमात झिलाचा नायतर चेडवाचा कौतुक होता… कोणीतरी ह्याका इचारता ,”मुला किती वेळ अभ्यास करतत.. ?” ह्याका झटको येता कारण त्यातला कायच ह्याका माहीत नसता… लोकांची नजर चुकवुन तो तिच्याकडे बघता… तिच्या नखपॉलिशच्या बोटांका मोजून आकडो नेमको सांगता आणि वाचलंव अशा अविर्भावात तिच्याकडे आभारात बघत मन म्हणता, “ता माज्यावांगडा आसा….!”

आईबाप थकतत…!
भरभरावन आशीर्वाद पांघरुन आणि संस्कार देऊन आता जग सोडतंत.
ह्याच्यातलो खंबीर अंबानी अचानक ढसाढसा कोसाळता. मुलाबाळांसमोर आपलो आपणाकच धीर देता. आईबापावांगडाच जग पण संपता, माझ्या अंतापर्यंत त्यांका थांबाक काय होता….
तो रडान कुडकुडाक लागता त्यावेळेक खांद्यार उबेचो मऊ हात आणि
त्यांका थांबाक काय होता…. रडान कुढान रिकामी झालेलो तो डगमगाक लागता त्यावेळेक खांद्यार तोच उबेचो मऊ हात त्याच्या हातीत चायचो वाफाळतो कप ठेवता….. मग मन स्वतः सावराची ताकद देवन आईवडिलांचे आभार मानत त्यांच्या आत्म्याक बिनधास्तीचा वाक्य ऐकवता…, “काळजी नको तुमका कारण, ता माझ्यावांगडा आसा….!” मुलाबाळा मोठी होतंत… आपापल्या कामात गुंतान जातत.

हो आपलो मोबाईल ढवाळता.
जुने मित्र मैत्रीण शोधताना कधीतरी एकत्र जमाचा ठरता. आपले बूट, कपडे वगैरेच्या पॅकिंगची ह्याका चिंताच नसता… कारण सवयीचा झालेला असता, ता माझ्यावांगडा आसा!”…

शेवटी एकदा मित्रांची एकठय भेट होता… नाचगाणी… त्यांची त्यांची पण एक वेगळीच कहाणी..!
प्रत्येक श्वासात उगाचच उसनी जवानी. असा करत करत कार्यक्रम आटपून घराकडे इल्यार हो ताणून देता सोफ्यार.
ती पाणी आणता.आता मात्र त्याची मती जाग्यार येता.. आपली ती राणी आसा असो साक्षात्कारही होता. मग सुरु होता ह्याची खजील झालेली वाणी. तिका गृहीत धरल्याची ऐकवता तिकाच कहाणी कहाणी ऐकान तो रडता.तिच्या विरहाची भीती त्याका कळता..!
आपले इम्याचे पॉलिसे, कागदांचे वगैरे सगळे जागा तिका पुन्हा दाखवता… तिनाच जपलेले कागद तिका आठवणीन जपाक सांगता. थोडो थरथरतच झोपाक तो गादीयेर लवांडता. आयुष्याच्या पिक्चराची सी.डी. मनांत चालू करता !

सुरवातीचे काही प्रसंग सोडले तर प्रत्येक प्रसंगात त्याच्यावांगडा तीच असता. लक्षात न घेऊनही ती कायम आपल्यावांगडा कशी होच विचार दाटता. इतक्यात लाईट जाता…हो भांभावता…!भियान बोमाटतलोच त्याआधीच बॅटरी घेऊन ती इलेली असता… मन शांत होता…. हायसा वाटता..!
तो आता हसत हसत झोपता झोपता गुलुगुलु स्वतःशीच तिच्या आभाराचा एक वाक्य म्हणता, “ता… माझ्यावांगडा आसा..”

तिची सगळी रुपा त्याका आठावतंत…. “जन्मात इल्यार नर्सबाईनं घेतलेला, आवशीनं, आजीयेनं, काकी, मामीयेनं, ताईन, मैत्रिणीन,बायलेन, चेडवान….. अशा घेतलेल्या एकेका सन्मान आणि हरएक प्रेम चुंबनाक वंदन करुनच तो म्हणता.
“ता माझ्या जगावांगडा आसा….ता माझ्यावांगडा आसा…!”

स्त्रीच्या हरएक रुपाचे आपण फक्त प्रेमाच्या आदरान आणि आदराच्या प्रेमान वागान आभारच मानू शकतव आणि बाकी तसा आपण करु शकनव नाय ह्या जेंव्हा त्याका कळता तेंव्हा त्याचे बंद डोळे कृतज्ञतेचे अश्रू ढाळतत. उशीयेचा कव्हर ओला होता…त्याका काळजी नसता कारण तो जाणत आसता की उद्या उशियेचा कव्हर बदाललेला आसतला कारण “ता माझ्यावांगडा आसा…पण ता कव्हर मीव बदलू शकतय….ठरवलंय तर…!”

सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | संपादकीय विशेष : माननव नाय ते ठरावीक वॅलेंटाईन सप्त्यातले दिवस… ठीक आसा.
पण जीवनाचो दृष्य अदृश्य 'किस डे' साजरो करता करता आभार मानुचे रवता नये ना तिचे असा त्याका वाटता आणि भावनांच्या कृतज्ञतेचा चुंबन आपसुक काळजातना दिला घेतला जाता.!

"ता माझ्यावांगडा आसा…?"असो एक प्रश्न पडाचो काळ आसता.
ह्या प्रश्नाचा उत्तर जेव्हा,
"ता माझ्यावांगडा आसा…" अशा विधानात' बदालता तो प्रपोज डे असो असता की रातभर झोपच नाय…!

दिवस सराकतत
शिक्षण वगैरे नायतर नोकरी धंद्यात सगळा लक्ष एकाच ठिकाणी एकवटता..
"ता माझ्यावांगडा आसा…"
आता ह्याच वाक्य जबाबदारीत बदालता.कामधंद्यात प्रगती करुची वाटता.
मित्र मैत्रीणींका वेळ देणासुद्धा जड होऊक लागता. वेळातवेळ काढून मित्रांबरोबर पार्टी वगैरे करताना एकेक मिनिट सुद्धा मोजताना खूप कायतरी गमावल्यासारखा वाटता.
मन खाऊक लागता आणि खयतरी मन 'आपण तिका देवचो वेळ ह्या मित्रांका दिलंव', ह्या अपराधी भावनेन म्हणतच असता की आपण असा करता नये कारण, "ता माझ्यावांगडा आसा…!"

काळ मोसम पकाडता.. म्हणजे वेग पकाडता. लग्नाबिग्नांत विघ्ना येवची चिन्हा दिसतत. तिच्या घरचे नायतर त्याच्याघरचे नात्याक स्विकारतीत की नाय ह्या चिंतेत एक आश्वासक इंधन वाक्य मात्र जीवनाची गाडी ढकलूक उपयोगी पडता…"ता माझ्या वांगडा आसा…!" लग्न होता आणि आपण खूप कायतरी मोठो पराक्रम करणार्या जगातील नेमक्या माणसात इल्याची भावना येता. दचकून जाग येवची गरज संपता. जीवनातले नवनवीन रंग आणि चवी अगदी सेवेक हजर वगैरे होतंत आणि एक वाक्य स्वतःच लाजत, मोहरुन मन बोलता…. "ता माझ्या वांगडा आसा.!"
लग्नाक काही काळ लोटता. जबाबदारे आणखी वाढतत उत्पन्न वगैरे वाढवचे, गुंतवणुक करुचे अनेक आर्थिक विचार मनाचो ताबो घेतत.. मनाच्या गोंधळात शरीराकडे दुर्लक्ष होता.. आणि ह्या तिच्या लक्षात येताच ती आपले पूर्वीचे खर्च, मागणे, हट्ट गुटाळून ठेवून नोकरी धंद्यात लक्ष घालता नायतर मदत तरी करता… आणि इतक्या करुनपण ताटात गरमागरम डाळभात वाढता तेंव्हा पोट भराच्या आधीच मन तृप्ततेचो ढेकर देवन म्हणता… "ता माझ्यावांगडा आसा..!"

आता पुढचे दिवस जातत….तिकापण दिवस जातत. भायरसुन खूश वाटणारी तो भुतुरसुन थोडो काळजीतच असता. नऊ महिने नऊ दिवस वगैरे संपल्यार ती आणखी कोणाकतरी जन्म देता.
त्याका बाळाचा त्वांड बघुच्या इतकोच आनंद, तिचो खूप दमलेलो हसरो चेहरो बघल्यार जा काय होता ना..!
ता त्याकाच कळता आणि हरवलेला त्याचा पाकिट सापडल्याच्या आनंदात त्याचा मन सरसरावन नाचता आणि इचार येता…'ता माझ्यावांगडा आसा….!'

मुलाबाळा मोठी होऊन वाढत आसतंत.
आता हो पण थोडो वायच थारावलेलो एक स्थीर माणुस बनता. त्याचे आई बाप ह्याका वायच घरात बरो वेळ देवक सांगतत.
'तो मात्र कायम कामात, मोबायलात नायतर टि. व्ही. तच कशाक',असो ते तगादो लावतत. त्याचा मन शाप इटामता आणि त्याका वाटता ," ह्यांका वेळबिळ देवक त्याची काय गरज जेंव्हा 'ती' सगळा पार पाडता ना..", म्हणजे तोच पार पाडत असता असाच त्याका वाटता कारण "ता माझ्यावांगडा आसा…!"

जा त्याचा ता तिचा..!
हो हिशोब करु शकणारी अंबानी त्याच्यात जलामलेलो असता. मुलाबाळांची शाळा त्याका मोठेपणाचो स्टेटस् सिबॉल वाटता. आपणाक जा मिळाक नाय त्याच्या दसपटीन तो त्यांका ओतता. खयल्यातरी कार्यक्रमात झिलाचा नायतर चेडवाचा कौतुक होता… कोणीतरी ह्याका इचारता ,"मुला किती वेळ अभ्यास करतत.. ?" ह्याका झटको येता कारण त्यातला कायच ह्याका माहीत नसता… लोकांची नजर चुकवुन तो तिच्याकडे बघता… तिच्या नखपॉलिशच्या बोटांका मोजून आकडो नेमको सांगता आणि वाचलंव अशा अविर्भावात तिच्याकडे आभारात बघत मन म्हणता, "ता माज्यावांगडा आसा….!"

आईबाप थकतत…!
भरभरावन आशीर्वाद पांघरुन आणि संस्कार देऊन आता जग सोडतंत.
ह्याच्यातलो खंबीर अंबानी अचानक ढसाढसा कोसाळता. मुलाबाळांसमोर आपलो आपणाकच धीर देता. आईबापावांगडाच जग पण संपता, माझ्या अंतापर्यंत त्यांका थांबाक काय होता….
तो रडान कुडकुडाक लागता त्यावेळेक खांद्यार उबेचो मऊ हात आणि
त्यांका थांबाक काय होता…. रडान कुढान रिकामी झालेलो तो डगमगाक लागता त्यावेळेक खांद्यार तोच उबेचो मऊ हात त्याच्या हातीत चायचो वाफाळतो कप ठेवता….. मग मन स्वतः सावराची ताकद देवन आईवडिलांचे आभार मानत त्यांच्या आत्म्याक बिनधास्तीचा वाक्य ऐकवता…, "काळजी नको तुमका कारण, ता माझ्यावांगडा आसा….!" मुलाबाळा मोठी होतंत… आपापल्या कामात गुंतान जातत.

हो आपलो मोबाईल ढवाळता.
जुने मित्र मैत्रीण शोधताना कधीतरी एकत्र जमाचा ठरता. आपले बूट, कपडे वगैरेच्या पॅकिंगची ह्याका चिंताच नसता… कारण सवयीचा झालेला असता, ता माझ्यावांगडा आसा!"…

शेवटी एकदा मित्रांची एकठय भेट होता… नाचगाणी… त्यांची त्यांची पण एक वेगळीच कहाणी..!
प्रत्येक श्वासात उगाचच उसनी जवानी. असा करत करत कार्यक्रम आटपून घराकडे इल्यार हो ताणून देता सोफ्यार.
ती पाणी आणता.आता मात्र त्याची मती जाग्यार येता.. आपली ती राणी आसा असो साक्षात्कारही होता. मग सुरु होता ह्याची खजील झालेली वाणी. तिका गृहीत धरल्याची ऐकवता तिकाच कहाणी कहाणी ऐकान तो रडता.तिच्या विरहाची भीती त्याका कळता..!
आपले इम्याचे पॉलिसे, कागदांचे वगैरे सगळे जागा तिका पुन्हा दाखवता… तिनाच जपलेले कागद तिका आठवणीन जपाक सांगता. थोडो थरथरतच झोपाक तो गादीयेर लवांडता. आयुष्याच्या पिक्चराची सी.डी. मनांत चालू करता !

सुरवातीचे काही प्रसंग सोडले तर प्रत्येक प्रसंगात त्याच्यावांगडा तीच असता. लक्षात न घेऊनही ती कायम आपल्यावांगडा कशी होच विचार दाटता. इतक्यात लाईट जाता…हो भांभावता…!भियान बोमाटतलोच त्याआधीच बॅटरी घेऊन ती इलेली असता… मन शांत होता…. हायसा वाटता..!
तो आता हसत हसत झोपता झोपता गुलुगुलु स्वतःशीच तिच्या आभाराचा एक वाक्य म्हणता, "ता… माझ्यावांगडा आसा.."

तिची सगळी रुपा त्याका आठावतंत…. "जन्मात इल्यार नर्सबाईनं घेतलेला, आवशीनं, आजीयेनं, काकी, मामीयेनं, ताईन, मैत्रिणीन,बायलेन, चेडवान….. अशा घेतलेल्या एकेका सन्मान आणि हरएक प्रेम चुंबनाक वंदन करुनच तो म्हणता.
"ता माझ्या जगावांगडा आसा….ता माझ्यावांगडा आसा…!"

स्त्रीच्या हरएक रुपाचे आपण फक्त प्रेमाच्या आदरान आणि आदराच्या प्रेमान वागान आभारच मानू शकतव आणि बाकी तसा आपण करु शकनव नाय ह्या जेंव्हा त्याका कळता तेंव्हा त्याचे बंद डोळे कृतज्ञतेचे अश्रू ढाळतत. उशीयेचा कव्हर ओला होता...त्याका काळजी नसता कारण तो जाणत आसता की उद्या उशियेचा कव्हर बदाललेला आसतला कारण "ता माझ्यावांगडा आसा...पण ता कव्हर मीव बदलू शकतय....ठरवलंय तर...!"

सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!