देवगड । प्रतिनिधी : तौक्ते वादळाच्या संकटा नंतर सावरण्याच्या प्रयन्तात असलेल्या देवगड तालुक्यला मात्र ही अतिवृष्टि काही स्वस्त बसु देत नाहीये. देवगड मध्ये कावले वाड़ी हे गांव खाड़ीच्या अगदी किना-यावर असल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितिचे वातावरण आहे.
देवगड कावलेवाड़ी हे पर्यटन दृष्ट्या अत्यंत मोहुन टाकणार खाडीकिनारी वसलेल एक छोटस गांव आहे. पण तौक्ते वादळाच्या कहराने तेथील मुख्य रस्ता खचून गेला आहे आणि आता या अतिवृष्टिमूळे बरीच संकटे ओढवत आहेत. भात शेतीसाठी बांधलेले बंधारे कोसळून खारे पाणी शेतीत घुसते. त्याचबरोबर या खाड़ी किनारी कालवे, तीसरे, शिणाने व काही प्रमाणात मासेमारी ही केली जाते. अतिवृष्टिमूळे कशा प्रकारे संकटाचा सामना करावा लागला आहे याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ प्रशांत राऊत यांनी व्यक्त केली आहे.
लवकरात लवकर ही अतिवृष्टि थांबावी आणि पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत व्हाव अशी भावना सर्व नागरिकांनमध्ये दिसून येत आहे.