१० फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
१९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना.१९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.