24.2 C
Mālvan
Monday, November 11, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

सिंधुदुर्गातील व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा बँकेने सहकार्य करावे : श्री विष्णू मोंडकर.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्या बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी व उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर आणि नूतन बँक संचालक श्री बाबा परब यांची पर्यटन महासंघाच्या वतीने ओरोस येथील सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालयात भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेने व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट,मच्छिमार,शेतकरी,व्यापारी व पर्यटन व्यावसायिक यांना व्यवसाय वाढीसाठी व जिल्ह्यात रोजगार निमिर्तीचे मोलाचे कार्य बँकेच्या माध्यमातून होत आहे गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील व्यावसायिक हा उध्वस्त झाला असून त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे थकीत कर्जाचे प्रमाण वाढले असून यासाठी बँकेच्या माध्यमातून व्यावसायिकांस दिलासा देण्यासाठी व नवउद्योजकास व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्यासाठी बँकेने मदत करावी अशी विनंती महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केली.
यावेळी बँक अध्यक्ष श्री मनीषजी दळवी व उपाध्यक्ष श्री अतुलजी काळसेकर यांनी सांगितले की सिंधुदुर्ग बँक हि व्यावसायिकांच्या सोबत असून बँकेचे कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांना त्यांचे कर्ज सुलभरित्या भरण्यासाठी बँक नवीन योजना लवकरच जाहीर करेल तसेच जिल्ह्यातील व्यवसाय वाढीसाठी उद्योजकानां व पर्यटन व्यावसायिक महासंघास बँक पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले
यावेळी महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर ,महासंघ महिला तालुका अध्यक्ष सौ मेघा गांवकर सौ चारुशीला आचरेकर, सौ कासवकर ,महासंघ शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष श्री सहदेव साळगांवकर श्री रवींद्र खानविलकर श्री मिलिंद झाड ,श्री रामा चोपडेकर,श्री दादा वेंगुर्लेकर ,श्री अभय पाटकर ,श्री मिथिलेश मिठबावकर श्री देवानंद लोकेगांवकर व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!