दशावतारातील अजिंक्यतारा निखळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा….!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक तथा लोकराजा दशावतारी नटसम्राट सुधीर कलिंगण यांचे आज पहाटे ३ वाजता दुःखद निधन झाले आहे.


सुधीर कलिंगण हे काही दिवस गोवा येथील व्हिजन हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. मात्र अनेक वर्ष रात्र रात्र जागवून रसिंकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या सुधीर कलिंगण यांनी जगाच्या रंगमचावरून अचानक निरोप घेतला आहे. दशावतारी चालक मालक संघ सिंधुदुर्गचे सहसचिव असलेल्या सुधीर कलिंगण यांनी अनेक भूमिका आजरामर केल्या आहेत. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या मानत घर करून आहेत. दशावतारी रंगमंच गाजवणारा रसिकांच्या हृदयातील अनमोल हिरा लोकराजा नटसम्राट सुधीर कलिंगणयांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नटवर्य बाबी कलिंगण यांच्या नंतर कलिंगण कुटुंबाचा दशावतारी कलेचा वारसा पुढे नेत अनेक नवीन दशावतारी कलाकार घडविणाऱ्या या नटसम्राटाच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, पुतणे यांच्या सोबत मोठा चाहता वर्ग आहे.