चिंदर | विवेक परब : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालवण यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्रैवार्षिक मेळावा आचरे येथील बागजामडूल रिसॉर्ट येथे मंगेश मसके, जिल्हाध्यक्ष को.म.सा.प. सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुजारिओ पिंटो (जिल्हा प्रतिनिधी सिंधुदुर्ग), रामचंद्र आंगणे (सल्लागार समिती सदस्य सिंधुदुर्ग), भरत गावडे (सचिव को.म.सा.प. सिंधुदुर्ग) हे उपस्थित होते. यावेळी मंगेश मसके यांनी मालवण को.म.सा.प. ने गेल्या तीन वर्षात आपल्या साहित्यिक कार्याचा वेलू पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत साठ को.म.सा.प. शाखांत कसा फडकत ठेवला त्याचे वर्णन केले आणि पुढील तीन वर्षासाठी विद्यमान अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची फेरनिवड व्हावी अशी शिफारस केली. त्याला सर्व सभेने एकमताने मंजुरी दिली.
को.म.सा.प.शाखा मालवण यांची सन 2022 ते सन 2025 ह्या कालावधीसाठी नूतन कार्यकारीणी आणि विभागप्रमुखांची निवड करण्यात आली.
1) सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष)
2) गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर (उपाध्यक्ष)
3) अनिरुद्ध लक्ष्मण आचरेकर (सचिव)
4) पांडुरंग गुरुदास कोचरेकर (खजिनदार)
5) जेरोन बस्त्याव फर्नांडिस (कारकारीणी सदस्य)
6) प्रकाश किरात पेडणेकर (कारकारीणी सदस्य)
7) सदानंद मनोहर कांबळी (कारकारीणी सदस्य)
8) एकनाथ मारुती गायकवाड (कारकारीणी सदस्य)
9) रामचंद्र एकनाथ कुबल (कारकारीणी सदस्य)
10) श्रुती केशव गोगटे (कारकारीणी सदस्य)
1) अशोक कांबळी (ज्येष्ठ नागरिक विभाग)
2) मनाली फाटक (ज्येष्ठ नागरिक विभाग )
1) योगेश मुणगेकर (युवा विभाग )
2) भावना मुणगेकर (युवा विभाग )
1) गोविंद प्रभू (बाल विभाग)
2) कामिनी ढेकणे (बाल विभाग)
1) मधुरा माणगावकर (महिला विभाग)
2) वर्षाराणी अभ्यंकर (महिला विभाग)
1) सुरेंद्र सकपाळ (शिक्षक विभाग)
2) परशुराम गुरव (शिक्षक विभाग)
1) नवनाथ भोळे (स्पर्धा विभाग)
2) चंद्रकांत माने (स्पर्धा विभाग)
यावेळी नूतन कार्यकर्त्यांसाठी यावेळी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. ती खालीलप्रमाणे.
1) रविंद्र वराडकर (मालवण)
2) रामचंद्र आंगणे ( कणकवली)
3) दीपक भोगटे (कट्टा)
4) माधव गावकर (असगणी)
5) जयप्रकाश परुळेकर (आचरे)
6) कपिल गुरव (आचरे)
सन 2022 ते 2025 ह्या पुढील तीन वर्षाच्या कालावधीत विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे यासाठी नियोजन करण्यात आले. श्री. रामचंद्र आंगणे, बाबाजी भिसळे, रुजारिओ पिंटो, रविंद्र वराडकर यांनी को.म.सा.प. मालवणने केलेल्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले.यावेळी को.म.सा.प.चे सर्वांत ज्येष्ठ सदस्य रविंद्र वराडकर यांनी को.म.सा.प. मालवणला नूतन विविध साहित्यिक कार्यासाठी रु.5000 (पाच हजार) ची देणगी दिली. आणि प्रत्येक सदस्याने तन व मनाबरोबरच यथाशक्ती धनही अर्पण करावे, कारण विविध उपक्रम संपन्न होत असताना प्रत्येक संस्थेला आर्थिक मदतीची फार गरज असते असे सांगितले.
प्राची चिंदरकर, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर यांनी अहवाल वाचन केले.सदर त्रैवार्षिक मेळाव्याला पूर्ण मालवण तालुक्यातून 64 सदस्य उपस्थित होते. स्भेचे व मेळाव्याचे पूर्ण नियोजन सुगंधा गुरव, सायली परब, योगेश मुणगेकर, संजय परब, मारुती आचरेकर, मृणालीनी आचरेकर, डिवाईन फर्नांडिस आदींनी केले. सर्वांच्या सहकार्याबद्दल अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
भावपूर्ण श्रध्दांजली.