29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : समस्त महाराष्ट्राची मायबोली असलेल्या आपल्या मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाची आवश्यकता विद्यार्थ्यांना समजावी या उदात्त हेतूने प्रेरित “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”शासकीय तंत्रनिकेतन मालवणमध्ये १४ ते २८जानेवारी २०२२ या दरम्यान कोविड १९ च्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला. दि.२१ जानेवारी रोजी “कविता वाचन ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवणच्या माजी मुख्याध्यापिका सौ.मेघना जोशी या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या.सर्वप्रथम संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी मराठी भाषा कशा प्रकारे विविधतेतून एकतेचे दर्शन घडविते याचे सुयोग्य विश्लेषण केले. सौ.मेघना जोशी यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन करून मराठी भाषेचे विविध पैलू उलगडले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करणाऱ्या कवितांचे सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमाचा कळस गाठला.या कार्यक्रमात संस्थेतील प्राध्यापक डॉ.योगेश महाडिक आणि प्राध्यापक दत्तप्रसाद गोलतकर यांनी आपल्या कविता सादर करून अधिकच रंगत भरली.
या पंधरवड्यांतर्गत उपक्रमाचे दुसरे पुष्प २२ जानेवारी रोजी शिवराज महाविद्यालय,गडहिंग्लजच्या मराठीच्या प्राध्यापिका डॉ.श्रद्धा पाटील यांनी “मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन” या विषयावर परिपूर्ण असे व्याख्यान देऊन गुंफले.डॉ.पाटील यांनी मराठी भाषेचा प्राचीन इतिहास ,मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मुद्देसूद विवेचन केले तसेच मराठीतील बोलीभाषांचे महत्त्व विशद केले.
संस्थेतील विद्यार्थ्यांच्या लक्षणीय सहभागामुळे तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या बहुमोल सहकार्य व मार्गदर्शनाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमांचे संयोजन संस्थेचे मराठी भाषा अधिकारी प्रा.सचिन राजाध्यक्ष यांनी केले. प्रा.दत्तप्रसाद गोलतकर यांनी सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. स्तुत उपक्रम.व आयोजक व सहभागी मान्यवरांचे मन:पुर्वक आभार.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : समस्त महाराष्ट्राची मायबोली असलेल्या आपल्या मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाची आवश्यकता विद्यार्थ्यांना समजावी या उदात्त हेतूने प्रेरित "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"शासकीय तंत्रनिकेतन मालवणमध्ये १४ ते २८जानेवारी २०२२ या दरम्यान कोविड १९ च्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला. दि.२१ जानेवारी रोजी "कविता वाचन " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवणच्या माजी मुख्याध्यापिका सौ.मेघना जोशी या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या.सर्वप्रथम संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी मराठी भाषा कशा प्रकारे विविधतेतून एकतेचे दर्शन घडविते याचे सुयोग्य विश्लेषण केले. सौ.मेघना जोशी यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन करून मराठी भाषेचे विविध पैलू उलगडले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करणाऱ्या कवितांचे सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमाचा कळस गाठला.या कार्यक्रमात संस्थेतील प्राध्यापक डॉ.योगेश महाडिक आणि प्राध्यापक दत्तप्रसाद गोलतकर यांनी आपल्या कविता सादर करून अधिकच रंगत भरली.
या पंधरवड्यांतर्गत उपक्रमाचे दुसरे पुष्प २२ जानेवारी रोजी शिवराज महाविद्यालय,गडहिंग्लजच्या मराठीच्या प्राध्यापिका डॉ.श्रद्धा पाटील यांनी "मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन" या विषयावर परिपूर्ण असे व्याख्यान देऊन गुंफले.डॉ.पाटील यांनी मराठी भाषेचा प्राचीन इतिहास ,मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मुद्देसूद विवेचन केले तसेच मराठीतील बोलीभाषांचे महत्त्व विशद केले.
संस्थेतील विद्यार्थ्यांच्या लक्षणीय सहभागामुळे तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या बहुमोल सहकार्य व मार्गदर्शनाने "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमांचे संयोजन संस्थेचे मराठी भाषा अधिकारी प्रा.सचिन राजाध्यक्ष यांनी केले. प्रा.दत्तप्रसाद गोलतकर यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!