भूप्रभात कवी :वैश्रीसुयोग ,सिंधुदुर्ग जिल्हा.

भूप्रभात…!
मी आपला निराश, सूर्यास पकडू पाही…
झाकोळ तुझ्या मुखीची, लयास भयभीतही मीही…!
आशेच्या टेकडीशी…नजर माझी राही…
काळजावरी हा हात… हातात नाही काही…!
सूर्य टेकड्यांच्या आड… दिसली हालचाल….
क्षणांत छेडले ते… सूर आणि ताल……!
वेडा मी तुझ्याशी…. उराशी मुक्त होतो….
उगीच टेकड्यांना… मानत शक्त होतो….!
हास्याने तुझ्या ह्या.. सूर्य पुनश्च जीवी…
भूमी तूच त्याची एक…. कोणास काय ठावी..!
सूर्याच्याही डोळी… आता भिडवेन मीही डोळा…
हट्टात तुझ्या नि माझ्या त्याचाही मुक्तमेळा…!
मजजवळी आता तो… करतोय ही विनवणी…
‘भूप्रभातीचे ‘ गूढ़….जाणू नये हां कोणी…!
तेथेच सूर्य हरला…. चंद्र गप्पचुप्प चित्र..
हट्टास भूप्रभाती… लपलाय तोच ‘मित्र…!”
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल .