कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली बाजारपेठेतल्या एका मेडिकल दुकानात काल एक भियवन टाकणारोच प्रकार घडलो.
काल मंगळवार..म्हणजे कणकवलेचो बाजाराचो दिवस आणि अशाच गर्देच्या दिवशीच एका बैलाक मेडिकल स्टोअरात घुसाची लहर इली. तसो तो बैल आणि त्याचे काही इतर वांगडी बाजारपेठेतल्या भाजीवाल्यांका आणि फळावाल्यांका नाकीनऊ आणून त्यांचो माल फस्त करुच्यासाठी प्रसिद्ध आसतच पण काल त्या बैलान मेडिकल दुकानाक भुतूर जावन दिलेली भेट खरोच एक चर्चेचो मुद्दो ठरलो.
नशिब बलवत्तर होता म्हणान त्या दुकानात काम करणार्या मुलींका आणि कर्मचार्यांका काय एक ईजा होवक नाय. नंतर आजुबाजुच्या व्यापारी आणि लोकांनी मिळान मेडिकल दुकानचे काऊंटर बाजुक करुन त्या ‘औषध देवक इलेल्या बैलाक’ मोकळी वाट करुन बाहेर काढलो.
नंतर आणखी काहीजणांच्या म्हणण्यानुसार हो तोच बैल होतो जो आठवडा बाजारात दिवसभर खूपजणांका हुल तरी देई होतो नायतर धडकावन तरी टाकी होतो.
मोकाट जनावरांचो उपद्रव ही समस्या आजपर्यंत फेरीवाले,भाजीवाले नायतर वाहनांका होती पण आज थेट एका मेडिकल दुकानात घुसापर्यंत एका बैलाची मजल गेली.
या बैलाच्या घटनेच्या बाबतीत कणकवलीत सगळ्यांच्या मनांत एक विचार मात्र घुटमळा होतो तो म्हणजे,” औषधाच्या दुकानात तो इलो खरो..पण नशिब…त्याना तसा कोणाक काय जालिम औषध देवक नाय ता..!”