बांदा ग्रामपंचायत तर्फे १४ व्या वित्त आयोग निधीतून केले गेले वाटप…
बांदा | राकेश परब : महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता बांदा ग्रामपंचायतने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार ‘सबका साथ सबका विकास’ आम्ही करतो. गावातील समूह बचत गटांना शिलाई मशीन वाटप करून बांद्यातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ यांनी केले.
बांदा येथे आयोजित १४ व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत तर्फे तब्बल ५७ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. राऊळ बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, मकरंद तोरसकर, राजेश विरनोडकर, श्याम मांजरेकर, अंकिता देसाई, समीक्षा सावंत, रिया अलमेडा, बाळू सावंत, शिलाई मशीन दुकानदार अभय देसाई, तसेच ग्रा. पं. कर्मचारी अनुजा देसाई, संजय सावंत, सोनाली पाटील, सफाई कामगार रामा पाटील, लखन पाटील, संदीप लाखे, भारत लाखे, संदीप वसकर उपस्थित होते.
श्वेता कोरगांवकर म्हणाल्या की बांद्यासारख्या ठिकाणी जर मिनी गारमेंट आल्यास आपण कुठेही मागे पडू नये. रोजगारातून उद्योग अशी संकल्पना समोर ठेवून समूह बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कुटुंबाने दारिद्र्य रेषेखालून बाहेर पडावे. केंद्राच्या ११३७ योजना आहेत त्याचा फायदा घेत आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. जर कुणाला समस्या किंवा काही कल्पना असतील तर सांगा आम्ही सहकार्य करू असे आश्वासन सौ. कोरगांवकर यांनी उपस्थित महिलांना दिले.
अक्रम खान यांनी सांगितले की जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत एवढ्या मोठ्या संख्येने शिलाई मशीन वाटप करणारी बांदा ही पहिली ग्रामपंचायत आहे. आम्ही रोजगारामार्फत महिलांच्या उद्धारासाठी गावातील समूह बचत गटांना तब्बल ५७ मशीन देत आहोत. याचा पुरेपूर उपयोग करत आपले आर्थिक हित साधावे असे श्री. खान यांनी सांगितले.
साई काणेकर, अभय देसाई यांनीही मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले. आभार लक्ष्मी सावंत यांनी मानले.
स्तुत उपक्रम.