28.2 C
Mālvan
Sunday, April 6, 2025
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकारने दत्तक घेतल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारची प्रशंसा.

- Advertisement -
- Advertisement -

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची पर्यटन महासंघास अपेक्षा असल्याचे विष्णू मोंडकर यांचे प्रतिपादन

चिंदर | विवेक परब : राज्यसरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला परंतु जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही ज़िल्ह्याच्या पर्यटन विकासात सरकारचे अधोरेखित होईल असे योगदान नाही .जिल्ह्यातील पर्यटन भारताच्या ,जगाच्या नकाशावर पोचविण्याचे महत्वाचे कार्य हे जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिक,पर्यटन व्यावसायिक यांचे आहे सरकारची कुठलीही मदत नसताना पर्यटन व्यवसाय उभा करण्यास शासनाची कुठलीही पॉलिसी,अनुदान नसताना स्थानिकांनी स्वबळावर पतसंस्था,शेड्युल बँक,सावकारी जास्त दराने कर्ज घेऊन जिल्ह्याचे नाव पर्यटन क्षेत्रात कार्य करून देशविदेशात पोचविले .
केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विषयासाठी दत्तक घेतल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बीच ,कल्चर ,ऍग्रो,मेडिकल ,हिस्ट्री,फूड टुरिझम क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी राज्य व केंद्र सरकार कडून स्थानिकांस आवश्यक टुरिझम पॉलिसी बनेल तसेच गेले दोन वर्षे नैसगिक आपदा ,कोरोना सारख्या महामारी मुळे उद्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांस नककीच बळ मिळेल अशी महासंघास वाटते .आज जिल्ह्यात सागरी पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे देशविदेशातील लाखो पर्यटक सागरी पर्यटनासाठी जिल्ह्यामध्ये येत असतात केंद्र सरकारने पर्यटन विषयी जिल्हा दत्तक घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हात खऱ्या अर्थाने सागरी पर्यटना बरोबर अन्य पर्यटन क्षेत्रात वाढ होईल यासाठी जिल्हातील व्यावसायिकांनी व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी समन्वयाची व पर्यटन वाढीची भूमिका ठेवावी याबाद्दल राज्य व केंद्र सरकारचे विशेष अभिनंदन तसेच यामुळे जिल्हातील पर्यटना मध्ये क्रांतिकारक बदलाची अपेक्षा महासंघास आहे अशी माहिती श्री बाबा मोंडकर पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!