28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

‘हा धन्वंतरी देव पाहू शकतो…!’ (प्रतिनिधी पॅटर्न :अखंड सदर.)

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी पॅटर्न (भाग : पहिला )
शिरगांव प्रतिनिधी : श्री.संतोष साळसकर.

जग आरोग्यविषयक भीषण परिस्थितीतून जात आहे. कोरोना व ओमायक्राॅनसारख्या महाभयंकर रोगांनी गेली दोन वर्षे अक्षरशः थैमान घातले आहे. साधा ताप आला तरी काही डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी तसेच ओळखीपाळखीचेही उपचार सोडून त्यांच्याकडे वेगळ्या अविश्वासू नजरेने बघतात. पण असे असतानाही समाजात काही धन्वंतरी बिनबोभाटपणे महा वैद्यकीयसेवा देत माणसांतील देवांचे आरोग्य जपत असतो. असे धन्वंतरी त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येक गरजू माणसाची आरोग्य चिकित्सा करतात…त्याचा खिसा भरलेला आहे किंवा नाही याचा विचारही न करता…! कारण पुराणातील धन्वंतरी म्हणजे देवांचे आरोग्य राखणारे तज्ञ म्हणून आपण जाणतो व असे एक धन्वंतरी डाॅक्टर हे जाणतात की प्रत्येक माणसांत देव असतो…!
ते डाॅक्टर आहेत देवगड तालुक्यामधल्या कुवळे गावातील डाॅक्टर प्रभाकर वासुदेव शेळके…..एक धन्वंतरी.!
गेली २८ वर्षे अव्याहतपणे कोणत्याही आर्थिकतेची अपेक्षा न ठेवता रुग्णांचीसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून अध्याकत्मिकवृत्तीने काम करणारे देवगड तालुक्यातील कुवळे येथील डॉ प्रभाकर वासुदेव शेळके आज वयाच्या ७२ व्या वर्षीही तेवढ्याच जोमाने काम करीत आहेत.खऱ्या अर्थाने ते कोव्हिड योद्धा म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहेत.
डॉ.शेळके हे मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सिनखेड(पूर्णा) गावचे.ते सन १९९३ साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोटकामते या गावी आले.तिथे त्यांचे मित्र डॉ. अशोक पाटील यांनी त्यांना निदर्शनास आणून दिले की देवगड तालुक्यातील रेंबवली गावात वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे.स्वतः डॉ.शेळके हे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण जनतेची जाण होती.त्या जाणीवेपोटी त्यांनी रेंबवली गावात भाड्याच्या खोलीत वैद्यकीय सेवा सुरू केली.सुरुवातीला त्यांना मालवणी भाषा समजत नव्हती.पण याच मालवणी भाषेतील लोकांना त्यांनी आपलेसे केले..व लोकांनिही त्यांना उचित् आपलेपणाचा सर्वोच्च सन्मान दिला .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणसांच्या प्रेमापोटी त्यांना मालवणी भाषेची गोडी वाटू लागली आणि ते कधी कोकणवासीय झाले ते त्यांनाच कळले नाही.
त्यानंतर त्यांनी साळशी गावात माजी सरपंच अनिल पोकळे यांच्या सहकार्याने आपला दवाखाना सुरू केला.सकाळी साळशी गावात,दुपारनंतर कुवळे,रेंबवली असे त्यांचे वैद्यकीयसेवेचे घड्याळ सुरू झाले.कितीही व्यस्त असले तरी ते आलेल्या प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने,प्रेमाने वागतात.एखादा गंभीर आजार असल्यास ते आपल्या ओळखीच्या किंवा इतरही तज्ञ डाॅक्टर्सकडे जायचा सल्ला देतात.आजच्या वैद्यकीय टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा त्यांचे गंभीर आजारावरचे निदान अचूक असते.गंभीर आजारामध्येही ते रुग्णांना धीर देतात.अपंग असो,वृद्ध असो त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.प्रसंगी त्यांनी स्वतःच्या खिशातून दिलदार मनाने रुग्णांच्या उपचारासाठी पैसे दिल्याची शेकडो उदाहरणे आहेतच व तशी जाहीर ग़वाहीसुद्धा रुग्ण देतात .त्यांचे मोठमोठ्या तज्ञ डॉक्टर्सशी सलोख्याचे संबंध असल्याने ते आपल्याकडील गंभीर अवस्थेतील रुग्णांना तज्ञ डॉक्टर्सकडे पाठवतात. स्वतः जातीनिशी लक्ष देतात.कुणीही फोन केला तरी ते रुग्णांच्या घरी जाऊन सेवा देतात.
आज मोबाईलचा जमाना आहे. पण २० वर्षांपूर्वी त्यांना कुणी साधा निरोप दिला तरी ते न चुकता त्या रुग्णाच्या घरी जाऊन सेवा देत होते.त्यांच्या पत्नीनेही त्यांना संसारमध्ये मोलाची साथ दिली.त्यांचा मोठा मुलगा अमोल हा एम.ए. बी.एड. असून कणकवली येथे शिक्षक आहे.तर मोठा मुलगा स्वप्नील हा मुंबई-कांदिवली येथे इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय करतो.मुलांवर त्यांनी चांगले संस्कार केले. आजही डॉ.शेळके हे भाड्याच्या खोलीत रहातात. त्यांनी जमीनजुमला,गाड्या वगैरे घेतले नाहीत..आजही ते दुचाकी मोटारसायकल गाडीचा वापर करून रुग्णांची सेवा करतात. कणकवली,देवगड, मालवण तालुक्यातील रुग्ण विश्वासाने त्यांच्याकडे येतात.त्यांनी आजपर्यंत अनेकांचे प्राण वाचवले.कठीण प्रसंगी प्रसंगावधान साधत त्यांनी वैद्यकीय सेवा देत रुग्णांना धीर पण दिला.त्यांच्या या निःस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीचा साळशी केंद्रशाळेच्या वतीने सत्कारही करण्यात आला.साळशी गावाच्या वतीने कोव्हिड योद्धा म्हणूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात त्यांनी मोठे महान कार्य केले. आपल्या कामाशी ते नेहमीच प्रामाणिक राहिले.कुठलाही डामडौल नाही.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. सतत मुखात रामनाम.एखादया रुग्णाची आर्थिक अडचण असली तर ते मोफत उपचार करतात पण रुग्णाची आरोग्य चिकित्सा झाल्याशिवाय तो रिकामा परतत नाही . कोरोनाच्या लॉकडाऊन काळात त्यांनी कधीच रुग्णांना वाऱ्यावर सोडले नाही.स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता त्यांनी रुग्णांना सेवा दिली.आज डॉ.शेळके यांचे नाव सर्वांच्या मुखातून आदराने घेतले जाते.खऱ्या अर्थाने ते गरिबांचे देवमाणूस आहेत.देवदूत आहेत.
“रामनाम ह्या धन्वंतरीच्या मुखी….
हा पहातो सर्वांचे जीवन करण्या…आरोग्यसुखी..!”

(धन्वंतरी डाॅक्टर प्रभाकर शेळके यांच्या सेवेला आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधी पॅटर्नचा पंचतारांकित भाव सन्मान.!⭐⭐⭐⭐⭐)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

"रामनाम ह्या धन्वंतरीच्या मुखी….
हा पहातो सर्वांचे जीवन करण्या…आरोग्यसुखी..!"

(धन्वंतरी डाॅक्टर प्रभाकर शेळके यांच्या सेवेला आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधी पॅटर्नचा पंचतारांकित भाव सन्मान.!⭐⭐⭐⭐⭐)

error: Content is protected !!