चिंदर / विवेक परब (विशेषवृत्त ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर गावचे सुपुत्र व सध्या मुंबईस्थीत असलेल्या श्री. केशव महादेव घाडी यांनी 14000 माचिस काड्यांपासून 3 फूट × 4 फूट आकाराचे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र बनवले.काल श्रीमान बाळासाहेबांच्या जयंतीचा योगायोग साधत दहिसर शाखा क्र. 5 शिवसेना नगरसेवक श्री संजय शंकर घाडी यांच्या हस्ते छायाचित्राचे अनावरण झाले यावेळी संजना घाडी, शाखाप्रमुख सचिन शिर्के, विद्या पोतदार, संदिप शेलार, स्वामिल माने हे उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक संजय घाडी यांनी शिवकेशव घाडी यांना कौतुकाची थाप देत त्यांची कला अशीच तेवत ठेवत उत्तरोत्तर नविन संकल्पना तयार करत रहायचे प्रोत्साहन दिले. बाळासाहेबांच्या या छायाचित्रा बद्दल शिवकेशव यांचे आभारही मानले.
केशव हे लहानपणा पासून कला क्षेत्राची जाण आहे. आपल्या वडिलांची कला जोपासत ते गणपती रंगविणे, वाॅलपेटिंग, छायाचित्रे रेखाटणे असा प्रवास करत त्यांनी “जे. जे. स्कूल ऑफ आर्ट” मधून फाईन आर्ट व कमर्शिअल आर्ट पर्यंतचे शिक्षण घेतले. शिवकेशव यांच्या या छायाचित्राची सर्वत्र दखल घेतली जात असून सर्वच स्तरातून त्यांची प्रशंसा होत आहे.