🔸 उपाध्यक्षपदी सुनिल मनोहर पवार
आचरा / विवेक परब : चिंदर येथील रामेश्वर विविध. सह.सेवा सोसायटी अध्यक्षपदी श्री सिताराम(देवेंद्र)हडकर तर उपाध्यक्षपदी सुनिल मनोहर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले.
सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून जिल्हा बँकेच्या सहकार्याने विविध योजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न राहाणार असून अध्यक्ष म्हणून संधी दिल्या बद्दल भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गांवकर व सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे हडकर यांनी आभार मानले.. यावेळी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले कि आपण प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय देण्याचा प्रयत्न करतो तसेच आपल्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात सोसायटी अध्यक्षपदा पासूनच झाली असून आपण प्रामाणिकपणे काम केलेल्याची पोच पावती विविध पदे उपभोगत आज भाजप तालुकाध्यक्षाच्या रुपात दिसत आहे. सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक यांनी शेतकऱ्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न करावा व हेच आपले मुख्य ध्येय ठेवा..
यावेळी सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष कोदे,महेंद्र मांजरेकर, संतोष गांवकर, दिगंबर जाधव, रवी घागरे, मनोज हडकर,पोलिस पाटील दिनेश पाताडे, संजय माळकर, प्रकाश मेस्री, दत्ता वराडकर, सतिश हडकर ,संजय लोके, आनंद पवार, विश्राम गोसावी, रोशन गोसावी, सुरेश साटम, परेश चव्हाण, बाळा लब्दे, रश्मी पाताडे, कवि माळगांवकर, दादा हडकर हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.