27.8 C
Mālvan
Tuesday, April 8, 2025
IMG-20240531-WA0007

वडाचापाट हायस्कुल येथे मासिक पाळी जागरण व व्यवस्थापन चर्चासत्र..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेमध्ये “जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा”या अभियानांतर्गत “मासिक पाळी व्यवस्थापन”या विषयावर उद्बोधन वर्ग व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. दीप्ती खोत (मानसोपचार तज्ञ) मुंबई यानि मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय?त्या संदर्भात घ्यावयाची स्वच्छता व काळजी तसेच आहार व मानसिक बदल याविषयी उद्बोधन केले.किशोरवयीन मुलींच्या मनामध्ये येणारे विचार व आकर्षण नैसर्गिक असून मनावर ताबा ठेवणे आपल्याच हातात असते असे सांगत मुलींनी जीवनामध्ये निर्णय कसे घ्यावे याचे मार्गदर्शन केले.या चर्चासत्रात विद्यार्थिनींनी देखील त्यांना छान प्रतिसाद देत,आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सौ.प्रीती सनये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .सूत्रसंचालन सौ.वेदिका दळवी यांनी तर आभार कु. प्रतिभा केळुसकर मॅडम यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेमध्ये "जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा"या अभियानांतर्गत "मासिक पाळी व्यवस्थापन"या विषयावर उद्बोधन वर्ग व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. दीप्ती खोत (मानसोपचार तज्ञ) मुंबई यानि मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय?त्या संदर्भात घ्यावयाची स्वच्छता व काळजी तसेच आहार व मानसिक बदल याविषयी उद्बोधन केले.किशोरवयीन मुलींच्या मनामध्ये येणारे विचार व आकर्षण नैसर्गिक असून मनावर ताबा ठेवणे आपल्याच हातात असते असे सांगत मुलींनी जीवनामध्ये निर्णय कसे घ्यावे याचे मार्गदर्शन केले.या चर्चासत्रात विद्यार्थिनींनी देखील त्यांना छान प्रतिसाद देत,आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सौ.प्रीती सनये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .सूत्रसंचालन सौ.वेदिका दळवी यांनी तर आभार कु. प्रतिभा केळुसकर मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!