आचरा/विवेक परब : आचरा येथील यशराज प्रेरणा संघटनेच्यावतीने काल रात्री ११ नंतर आचरा तिठा येथील उर्वरित ४ गतिरोधकांवर रंग काम करण्यात आले.. अनेक वेळा गतीरोधक वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे जिव घेणे अपघात होत असतात. या कामाला सहकार्य करण्यासाठी संघटनेचे जितू नायर ,ओंकार घाडी, कार्यवाह -मिनल कोदे ,अध्यक्ष- मंदार सरजोशी यांनी मेहनत घेतली.. प्रकाश व्यवस्था संतोष सामंत , पाणी व्यवस्था प्रफुल्ल नलावडे यांनी केली.अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संघटेच्या सामाजिक कामाचा सर्वस्तरातून गौरव होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -