आचरा | अनिकेत पांगे :(विशेष वृत्त) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा परिसरात गेले काही महिने एक नांव समाजसेवेत,रुग्णसेवेत इतके वारंवार घेतले जाते की मुद्दाम थांबून त्यावर विचार करणे ही सर्वसामान्य माणूस तथा नागरिक म्हणून गरज पडते.
काय कोरोनाचा होता तरिही डाॅक्टर सिद्धेश सकपाळ हे नांव,काळ कोरोना नियंत्रणाचा तरिही तेच नांव, एखादी क्रिकेट स्पर्धा असो तेच नांव किंवा कुठलीही सांस्कृतिक आखणी असो तरिही तेच नांव…!
साधारण 2000 ते 2004 सालापर्यंत राहुल द्रविड जसा बॅटिंग, बोलिंग व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर सर्वात जास्त भरोसेमंद नांव म्हणून आपल्याला आठवतं अगदी तसेच डाॅक्टर सिद्धेश सकपाळ हे आजकाल झालेले आहे.
मधुमेह तपासणी शिबीर असो अथवा चिंदर गांवचा एखादा सोहळा असो किंवा आचरा परिसरातील सामाजिक शुद्धतेचा सोहळा असो सिद्धेश सकपाळ हे नांव आदराने घेतले जाते…!
हा माणूस म्हणून कार्यरत असलेला सुंदर गळ्याचा डाॅक्टर नेमका कसा व किती गुणवत्तापूर्ण व्यकिमत्व आहे त्याची चर्चा सध्या नेहमीच रंगते आहे.
लवकरच हा माणुस आपल्या आपली सिंधुनगरी चॅनेल माध्यमातून आपल्यासमोर ‘सज्जांकित’ म्हणून येईल पण तोपर्यंत अशा व्यक्तिमत्त्वाचे मनापासून आपण अभिनंदन करुन शकतो…..
होय ना…!