29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर परिसराची स्वच्छता..

- Advertisement -
- Advertisement -

स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत राबविले श्रमसंस्काराचे धडे

बांदा | राकेश परब :जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेच्या वतीने स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत स्वच्छता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर चकचकीत करण्यात आला.
बांदा गावचे आराध्य दैवत श्री बांदेश्वर भूमिका देवी या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसराची साफसफाई करून भूमिका मंदिर व बांदेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ भारत या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य राबून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
देवीच्या जत्रेनंतर नंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो, हा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली.
बांदा केंद्र शाळेच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमासाठी ग्रामपंचायत बांदा यांचेकडून विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड ग्लोज व मास्क चे वाटप करण्यात आले ,तसेच बांदेश्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यासाठी अल्पोपहाराची सोय केली.
या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला सावंत मोर्ये,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये , प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे. डी. पाटील, स्काऊट गाईडचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी श्री अन्वर खान सर , शिक्षणप्रेमी सदस्य अरूण मोर्ये , माजी ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक, राजा सावंत, ,आनंद देसाई ,अनुज बांदेकर आदी ग्रामस्थ व सहभागी झाले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत राबविले श्रमसंस्काराचे धडे

बांदा | राकेश परब :जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेच्या वतीने स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत स्वच्छता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर चकचकीत करण्यात आला.
बांदा गावचे आराध्य दैवत श्री बांदेश्वर भूमिका देवी या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसराची साफसफाई करून भूमिका मंदिर व बांदेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ भारत या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य राबून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
देवीच्या जत्रेनंतर नंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो, हा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली.
बांदा केंद्र शाळेच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमासाठी ग्रामपंचायत बांदा यांचेकडून विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड ग्लोज व मास्क चे वाटप करण्यात आले ,तसेच बांदेश्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यासाठी अल्पोपहाराची सोय केली.
या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला सावंत मोर्ये,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये , प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे. डी. पाटील, स्काऊट गाईडचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी श्री अन्वर खान सर , शिक्षणप्रेमी सदस्य अरूण मोर्ये , माजी ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक, राजा सावंत, ,आनंद देसाई ,अनुज बांदेकर आदी ग्रामस्थ व सहभागी झाले होते.

error: Content is protected !!