शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील रेंबवली येथील प्राथमिक शाळेजवळील मुख्य विद्युत वाहिनीच्या डीपी वरील प्रवाहित होणाऱ्या वाहिनीच्या तारांना कोटिंग नसल्यामुळे याठिकाणी कोणत्याही क्षणी जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात न आल्याने गुरा-ढोरांना, माणसांना धोकादायक झाली आहे.रेंबवली हे गाव देवगड तालुक्याच्या एका टोकाला असून मालवण तालुक्याला लागून आहे.या गावाची कुवळे गावात आहे. डोंगराळ भागात हे गाव वसलेले आहे.या गावाला विद्युत पुरवठा करणारी मुख्य विद्युत डीपी ही प्राथमिक शाळेनजीक आहे.ही मुख्य डीपी देखील नादुरुस्त अवस्थेत आहे.या डीपीवरून प्रवाहित होणाऱ्या सर्व तारांचे प्लॅस्टिक कोटिंग पूर्णतः निघालेले असल्याने या उघड्या तारांना कुणाचा स्पर्श झाला तर मोठी जीवित हानी होऊ शकते. बाजूला खूप झाडी-झुडपी वाढलेली आहेत.त्यामुळे या ठिकाणी गुरे चरावयास आल्यास किव्हा कुना व्यक्तीचा चुकून तारांना स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.
नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामध्ये या भागातील विद्युतवाहिनीचे खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी या मुख्य डीपीची दुरुस्तीसाठी येथील माजी जि. प.सदस्य सुभाष नार्वेकर,तसेच ग्रामस्थांनी संबंधित विभागाला लेखी कळऊनही अद्याप काही कार्यवाही झालेली नाही.तरी तात्काळ या डीपीची दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.