मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: श्रीमंत पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या १९८९ साली बि. एससी. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सावंतवाडी येथील माडखोल धरणाच्या निसर्गाने नटलेल्या सुंदर परिसरातील सावंत फार्म हाऊस मध्ये मोठया थाटात पार पडले.
मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग मधील ६५ माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत मनसोक्त आनंद घेतला. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी जगदीश सावंत, राजन ठाकूर, संतोष नाईक, पराग सावंत, विल्यम फर्नांडिस, रवी महाबळ, राम सावंत, विनय पाटील आदीनि विशेष मेहनत घेतली.