विशेष
सुयोग पंडित, अनिकेत पांगे ,विवेक परब : श्री दत्त महाराज म्हणजे ब्रम्हा,विष्णू व महेश अशा त्रिगुणात्मक अवतारांचे मुख्य दैवत.
‘ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’अशा मंत्रोच्चारांनी संपूर्ण सजीव सृष्टीतील त्रिगुणात्मांचे महात्म्य दर्शविणारी सत्व दिशा असेही श्री दत्त भक्तीला म्हणता येईल.
हिंदू पौराणिक सत्व साहित्यानुसार दत्त,सोम व दुर्वास हे तीन बंधु विष्णू, ब्रम्हा, शिव यांचे अवतार आहेत. पूर्वकाळामध्ये विष्णुचा अवतार मानल्या जाणार्या श्री दत्तांचे स्वरुप उत्तरकाळात ब्रम्हा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरुप सामावून घेत त्रिमुखी रुपात जडत गेले.
श्री दत्त हे योगसिद्धी व त्याहीपुढे जात जाणली तर जीवयोग सारासार जाणिव करुन घ्यायचे देव सामर्थ्य तथा दैवत आहेत.
श्री संत तुकाराम महाराज,श्री संत एकनाथ महाराज आदी मराठी संतांनी श्री दत्तांच्या त्रिमुखी असण्याचे शाश्वत उल्लेख त्यांच्या अभंगांद्वारा सामान्य माणूस जातीला करुन दिलेत.
श्री सद्गुरुचरित्र, नवनाथ भक्तीसार आदी पवित्र ग्रंथ व सार पोथ्यांमध्ये सदर नामोल्लेख प्रकर्षाने व विस्तृतपणे केलेले आहेत.
श्री क्षेत्र औदुंबर, श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, श्री क्षेत्र पिठापूर, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र माहूर व श्री क्षेत्र गिरनार पर्वत ही श्री दत्तांची तीर्थक्षेत्रे आहेत.
श्री दत्तजयंती किंवा श्री दत्त हे पर्व म्हणून खास विधींत वगैरे नक्कीच कुठे आखलेले नाहीत…कारण त्यांचे शाश्वत त्रिगुणात्मक असणे व जगणे हाच तो विधी असावा.
चिंतन, प्रार्थना, किर्तन,भजन आणि श्री दत्तग्रंथांचे वाचन यांचा मेळा हा संपूर्ण जीवनच म्हणता येईल.
श्री दत्तजयंती या सोहळ्यादरम्यान विविध ठिकाणी व महाराष्ट्र राज्यात सर्वत्र या मेळ्याचे अध्यात्मिक आयोजन केले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री दत्तभक्तही विविध ठिकाणी या दत्तजयंती सोहळ्यापूर्वी एखाद
दोन दिवस व श्री दत्तजयंतीदिवशी या मेळ्याचे यथाशक्ती आयोजन करतात.
जन्म देणारे तथा निर्माता, सांभाळणारे पालक आणि जीवाला योग्य तथास्तु करणारे हे ते तीन सत्वगुण जाणून घ्यायचे अनेक सात्विक प्रयत्न म्हणजेच श्री दत्तजयंती हा जीवनाचा जागृत उत्सवच म्हणता येईल. श्री दत्तजयंतीच्या विविध ठिकाणच्या सोहळा कार्यक्रम यांना अनेक शुभेच्छा.
!!! श्री गुरुदेव दत्त !!!