29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

इन्सुली-खामदेव नाका परिसरात राहणाऱ्या कय्यूम कित्तूर यांच्या घरात तब्बल साडेसहा फुटी नाग पकडला.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा / राकेश परब : इन्सुली-खामदेव नाका परिसरात राहणाऱ्या कय्यूम कित्तूर यांच्या घरात तब्बल साडेसहा फुटी नाग बघितल्यानंतर घरातील सर्वांच भयभीत झाले. सदर प्रकार घरातील लहान मुलीने पहिला आणि तिने आरडाओरड केला. त्यानंतर शेजारील व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार पडला. ही घटना काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती श्री. कित्तूर यांनी सर्पमित्र नवीद हेरेकर यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या सापाला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले. रात्रौ उशिरा कित्तूर यांच्या घरात नाग घुसला होता. दरम्यान तो घरातील एका कोपऱ्यात फणा करुन बसला होता. हा प्रकार त्यांच्या घरातील लहान मुलीने पाहिल्यानंतर तिने एकच आरडाओरडा केला. यावेळी घरातील व्यक्तीने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता सगळेच भयभीत झाले. नाग फणा करून बसलेला भला मोठा नाग होता.हा पहिल्यानंतर कित्तूर यांनी प्रसंगावधान दाखवत त्या सापाला न मारता याबाबतची माहिती सर्पमित्र हेरेकर यांना दिले. माहिती मिळताच हेरेकर यांनी रात्रीचे साडेबारा वाजले असतानासुद्धा त्याठिकाणी अवघ्या पंधरा मिनिटात पोचत “त्या” सापाला जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा / राकेश परब : इन्सुली-खामदेव नाका परिसरात राहणाऱ्या कय्यूम कित्तूर यांच्या घरात तब्बल साडेसहा फुटी नाग बघितल्यानंतर घरातील सर्वांच भयभीत झाले. सदर प्रकार घरातील लहान मुलीने पहिला आणि तिने आरडाओरड केला. त्यानंतर शेजारील व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार पडला. ही घटना काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती श्री. कित्तूर यांनी सर्पमित्र नवीद हेरेकर यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या सापाला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले. रात्रौ उशिरा कित्तूर यांच्या घरात नाग घुसला होता. दरम्यान तो घरातील एका कोपऱ्यात फणा करुन बसला होता. हा प्रकार त्यांच्या घरातील लहान मुलीने पाहिल्यानंतर तिने एकच आरडाओरडा केला. यावेळी घरातील व्यक्तीने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता सगळेच भयभीत झाले. नाग फणा करून बसलेला भला मोठा नाग होता.हा पहिल्यानंतर कित्तूर यांनी प्रसंगावधान दाखवत त्या सापाला न मारता याबाबतची माहिती सर्पमित्र हेरेकर यांना दिले. माहिती मिळताच हेरेकर यांनी रात्रीचे साडेबारा वाजले असतानासुद्धा त्याठिकाणी अवघ्या पंधरा मिनिटात पोचत "त्या" सापाला जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

error: Content is protected !!