कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): आदर्श व्यापारी संघटना,तळेरेच्या अध्यक्षपदी राजू जठार आणि सचिवपदी अमोल कल्याणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कल्याणकर कॉम्प्लेक्स तळेरे येथे आदर्श व्यापारी संघटनेच्या पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्षांसह नूतन कार्यकरिणीची निवड करण्यात आली. राजू जठार वुई सध्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सहकार्यवाह आहेत. आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे माजी अध्यक्ष असून वामनराव महाडिक हायस्कुल चे कार्यकारिणी सदस्यही आहेत.विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांवर काम केले आहे. व्यापाऱ्यांच्या समस्यांची राजू जठार याना चांगली जाण असून आपल्या अनुभवाचा फायदा तळेरे गावातील व्यापारी बंधूंना करण्याचा मानस जठार यांनी व्यक्त केला आहे. आदर्श व्यापारी संघटना तळेरे चे हे 65 वे वर्ष आहे. यावेळी तळेरेतील सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. मुंबई गोवा नॅशनल हायवेवरील आणि कोल्हापूर विजयदुर्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडणारी तळेरे ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.बाजारपेठेतील वाहनांचे पार्किंग, वाहतूक, बाजारपेठेतील स्वच्छता, मच्छीमार्केट, पावसाळ्यात साचणारे पाणी, हायवेचे अरुंद सर्व्हिस रोड, कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची काळजी आदी विषयांवर व्यापक चर्चाविनिमय करण्यात आला. एक वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड करण्यात आलेली नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – राजू जठार, उपाध्यक्ष – प्रवीण वरुणकर, दशरथ उर्फ बाबू कल्याणकर, विनोद धूरे, सचिव – अमोल कल्याणकर, सहसचिव – बच्चू भांबुरे, खजिनदार राजेंद्र पिसे, विश्वजित तळेकर, सल्लागार – अरविंद तळेकर, चंद्रशेखर डंबे, वैभवकुमार कल्याणकर, संतोष मिराशी, भाई लडगे, आशिष पिसे, दाजी कदम, कार्यकारिणी सदस्य – योगेश मुद्राळे, प्रमोद खटावकर, बाळा खटावकर, विठोबा माळवदे, बंडया महाडिक, बंड्या डंबे, सुयोग महाडिक, दत्ता खटावकर, रविराज कुमठेकर, उमेश कदम, कल्पेश तळेकर, विलास डंबे, सिद्धेश वरुणकर, संतोष तळेकर,रुपेश खटावकर, सचिन वाडेकर, हितेश पटेल, राजू वाडेकर, नितेश पिसे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -