आम्ही मालवणी सामाजिक मंच समूहाचे सर्वेसर्वा श्री सतेज दळवी यांनी केली ए.एम.पी.एल.ची घोषणा..!
मुंबई व महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट चाहत्यांना लागली होती प्रचंड उत्कंठा..!
मुंबई | क्रिडा वृत्त : आम्ही मालवणी या बहुचर्चित आणि आघाडीच्या सामाजिक मंचाची ए.एम.पि.एल. म्हणजेच आम्ही मालवणी क्रिकेट लीग ही स्पर्धा अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील क्रिकेट रसिकांच्या प्रचंड आवडीची स्पर्धा असते. कोरोना संकट व इतर बाबी लक्षात घेता यंदाच्या एम.एम.पी.एल. वरही प्रश्नचिन्ह होतेच परंतु नुकतेच समूहाचे सर्वेसर्वा व स्पर्धेचे आयोजन प्रमुख श्री.सतेज दळवी यांनी स्पर्धा होईल असे स्पष्टही केले होते. स्पर्धेची नेमकी तारीख मात्र त्यांनी आज जाहीर करुन समस्त आम्ही मालवणी सभासद तसेच क्रिकेट चाहता वर्ग व खेळाडुंना अतिशय उत्साहाची वार्ता दिली आहे.
एम.एम.पी.एल.चा पाचवा मोसम रविवार दिनांक 23 जानेवारीला मुंबई येथे मुक्रर झाला आहे.
कोरोनाच्या चिंतेने थोड्याशा कोमेजलेल्या उत्सुक संघ,खेळाडू व प्रेक्षकांच्या चेहर्यावर ही बातमी एक ‘ सतेज चैतन्य झळाळी’ घेऊन आली आहे असेच चित्र सध्या विविध डिजिटल सामाजिक मंचावर दिसत आहे.
फोटो सौजन्य: आम्ही मालवणी फेसबुक समूह वाॅल