28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

शिरगांवच्या सुधीर साटम यांच्या लेदरबाॅल क्रिकेट प्रशिक्षण’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ‘प्रचितीचे सच्चे दिन’ सुरु…! (क्रिडा विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव क्रिकेट अकॅडमीचे दोन खेळाडू निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेचा ठरले हिस्सा….!

शिरगांव | (संतोष साळसकर /सुयोग पंडित) : क्रिडाविशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या ठिकाणी लेदरबाॅल प्रशिक्षण उपलब्ध होते. जिल्ह्यातील काही पालक अतिशय मनोभावे मुलांना मुंबई, पुणे येथेही प्रशिक्षणाकरीता पाठविण्याचे पर्यायही निवड होते. अशातच गेली पाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगांव हे एक ठिकाण हळूहळू लेदरबाॅल क्रिकेटचे सशक्तीकरण करत होते. ते सशक्तीकरण करणारा माणुस हा सर्वांसाठी एक संपूर्ण व्यावसायिक आणि हौशी प्रशिक्षक अशा स्वरुपांत ओळखला जात होता. लेदरबाॅल क्रिकेटचे व्रत घेतल्यासारखा जगणारा हा माणुस “हौशी प्रशिक्षक” या संज्ञेमध्ये असणे ही खंत त्यालाही वाटली असेलच परंतु त्याने ती आजपर्यंत कधी जाहीर मांडलेली नाही आहे. मनाच्या कोपर्यात ती खंत त्याला कदाचित असेल किंवा नसेलही परंतु त्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटसाठीचे योगदान आता ‘व्यावसायिक सरावरील क्रिकेटमध्ये’ कायमचे उल्लेखले गेले जाईल अशाप्रकारे कोरले गेलेले आहे. महत्वाचे म्हणजे ते प्रशिक्षण त्याने स्वखर्चाने करणे हीच गोष्ट त्याच्यातील तळमळीची ओळख म्हणून पुरेशी असताना त्याच्या यश व अपयशाची चर्चाही करणे चूकच कारण तो माणुस तेंव्हाच जिंकला होता जेंव्हा त्याने ‘शिरगांव क्रिकेट अकॅडमी’ चा प्रकल्प तोही संपूर्ण मोफत सुरु केला होता. महत्त्वाकांक्षेसोबत ग्रामीण भागातील लहान मुलांना स्वतः वेळ काढून धीराने लेदरबाॅल क्रिकेट प्रशिक्षण देणे हे आंतरराष्ट्रीय कार्य केलेले ते नांव आहे शिरगांव येथील व्यावसायिक आणि अस्सल व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षक श्री.सुधीर साटम. नुकतीच शिरगांव क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू आर्यन कदम व असद गिरकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा १६ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ‘इन्व्हीटेंशन लीग’ च्या पुणे येथे झालेल्या साखळी सामन्यात सिंधुदुर्ग जिल्हा संघातून हे दोन खेळाडू सहभागी झाले होते.आर्यन कदम व असद गिरकर या दोघांची यापूर्वी १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जिल्हा संघात निवड झाली होती.शिरगाव क्रिकेट अकॅडमीच्या एकूण १८ खेळाडूंची यापूर्वी वेगवेगळ्या गटात जिल्हा संघात निवड झाली आहे.तसेच शिरगांव क्रिकेट अकॅडमीचा आणि पुं.अं.कर्ले महाविद्यालयाचा खेळाडू यश घाडी याची १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती.आता पुन्हा त्याची २५ वर्षाखालील संघात पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय महाराष्ट्र संघात सिंधुदुर्ग जिल्हयातून एकमेव खेळाडू म्हणून आज निवड झाली आहे. या सर्वांना अकॅडमीचे प्रशिक्षक सुधीर साटम व उदय रुमडे यांचे मार्गदर्शन लाभले.या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी शिरगांव क्रिकेट अकॅडमी या प्रकल्पाकडे निव्वळ हौशी उपक्रम म्हणून पाहणार्या सर्वांनाच आता सुधीर साटम यांच्या सखोल अभ्यासपूर्ण महत्वाकांक्षी प्रकल्पाची वास्तव प्रचिती आलेली आहेच. या अकॅडमीतल खेळाडू आणि सुधीर साटम हे नांव आता लेदरबाॅल व्यावसायिक क्रिकेटसाठी नेहमीच घेतले जाणार असल्याने पुरस्कर्ते आणि क्रिकेट तंत्रज्ञ यांनी या प्रकल्पाशी, खेळांडुंशी जोडले जाणे हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडा सक्षमीकरणाची एक महत्वाची पायरी ठरेल. शिरगांव क्रिकेट अकॅडॅमीला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचे योगदान दिलेले असेल त्यांच्याही समाधानामध्ये लेदरबाॅल क्रिकेटचे खरे उपासक नक्कीच सामील असतील.

(फोटोत डावीकडे आर्यन कदम व उजवीकडे यश घाडी)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. अण्णा साटम आपले अतिशय सुंदर काम.
    आपल्याला यापुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
    आपल्या शिष्यांना उदंड यश मिळो! हीच सदिच्छा!

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव क्रिकेट अकॅडमीचे दोन खेळाडू निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेचा ठरले हिस्सा....!

शिरगांव | (संतोष साळसकर /सुयोग पंडित) : क्रिडाविशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या ठिकाणी लेदरबाॅल प्रशिक्षण उपलब्ध होते. जिल्ह्यातील काही पालक अतिशय मनोभावे मुलांना मुंबई, पुणे येथेही प्रशिक्षणाकरीता पाठविण्याचे पर्यायही निवड होते. अशातच गेली पाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगांव हे एक ठिकाण हळूहळू लेदरबाॅल क्रिकेटचे सशक्तीकरण करत होते. ते सशक्तीकरण करणारा माणुस हा सर्वांसाठी एक संपूर्ण व्यावसायिक आणि हौशी प्रशिक्षक अशा स्वरुपांत ओळखला जात होता. लेदरबाॅल क्रिकेटचे व्रत घेतल्यासारखा जगणारा हा माणुस "हौशी प्रशिक्षक" या संज्ञेमध्ये असणे ही खंत त्यालाही वाटली असेलच परंतु त्याने ती आजपर्यंत कधी जाहीर मांडलेली नाही आहे. मनाच्या कोपर्यात ती खंत त्याला कदाचित असेल किंवा नसेलही परंतु त्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटसाठीचे योगदान आता 'व्यावसायिक सरावरील क्रिकेटमध्ये' कायमचे उल्लेखले गेले जाईल अशाप्रकारे कोरले गेलेले आहे. महत्वाचे म्हणजे ते प्रशिक्षण त्याने स्वखर्चाने करणे हीच गोष्ट त्याच्यातील तळमळीची ओळख म्हणून पुरेशी असताना त्याच्या यश व अपयशाची चर्चाही करणे चूकच कारण तो माणुस तेंव्हाच जिंकला होता जेंव्हा त्याने 'शिरगांव क्रिकेट अकॅडमी' चा प्रकल्प तोही संपूर्ण मोफत सुरु केला होता. महत्त्वाकांक्षेसोबत ग्रामीण भागातील लहान मुलांना स्वतः वेळ काढून धीराने लेदरबाॅल क्रिकेट प्रशिक्षण देणे हे आंतरराष्ट्रीय कार्य केलेले ते नांव आहे शिरगांव येथील व्यावसायिक आणि अस्सल व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षक श्री.सुधीर साटम. नुकतीच शिरगांव क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू आर्यन कदम व असद गिरकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा १६ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 'इन्व्हीटेंशन लीग' च्या पुणे येथे झालेल्या साखळी सामन्यात सिंधुदुर्ग जिल्हा संघातून हे दोन खेळाडू सहभागी झाले होते.आर्यन कदम व असद गिरकर या दोघांची यापूर्वी १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जिल्हा संघात निवड झाली होती.शिरगाव क्रिकेट अकॅडमीच्या एकूण १८ खेळाडूंची यापूर्वी वेगवेगळ्या गटात जिल्हा संघात निवड झाली आहे.तसेच शिरगांव क्रिकेट अकॅडमीचा आणि पुं.अं.कर्ले महाविद्यालयाचा खेळाडू यश घाडी याची १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती.आता पुन्हा त्याची २५ वर्षाखालील संघात पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय महाराष्ट्र संघात सिंधुदुर्ग जिल्हयातून एकमेव खेळाडू म्हणून आज निवड झाली आहे. या सर्वांना अकॅडमीचे प्रशिक्षक सुधीर साटम व उदय रुमडे यांचे मार्गदर्शन लाभले.या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी शिरगांव क्रिकेट अकॅडमी या प्रकल्पाकडे निव्वळ हौशी उपक्रम म्हणून पाहणार्या सर्वांनाच आता सुधीर साटम यांच्या सखोल अभ्यासपूर्ण महत्वाकांक्षी प्रकल्पाची वास्तव प्रचिती आलेली आहेच. या अकॅडमीतल खेळाडू आणि सुधीर साटम हे नांव आता लेदरबाॅल व्यावसायिक क्रिकेटसाठी नेहमीच घेतले जाणार असल्याने पुरस्कर्ते आणि क्रिकेट तंत्रज्ञ यांनी या प्रकल्पाशी, खेळांडुंशी जोडले जाणे हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडा सक्षमीकरणाची एक महत्वाची पायरी ठरेल. शिरगांव क्रिकेट अकॅडॅमीला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचे योगदान दिलेले असेल त्यांच्याही समाधानामध्ये लेदरबाॅल क्रिकेटचे खरे उपासक नक्कीच सामील असतील.

(फोटोत डावीकडे आर्यन कदम व उजवीकडे यश घाडी)

error: Content is protected !!