कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपाध्यक्ष सावळाराम कुर्ले, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, खजिनदार मधुकर प्रभुगावकर,सचिव राजू राणे, आदी उपस्थित होते.