राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने १० डिसेंबर रोजी ओरोस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी न्याय यात्रा.
बांग्लादेश आणि विविध देशातील हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा एकत्रित निषेध करणार.
प्रतिनिधी : मी जसा हिंदू आहे व सन्मानाने माझ्या देशात जगतो तसे विविध देशातील हिंदू बांधव जगले पाहिजेत आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हिंदूंवरील अन्यायाचा निषेध केला पाहिजे असे परखड मत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. आमदार निलेश राणे यांनी १० डिसेंबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने ओरोस येथे आयोजित हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हायची हाक रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना दिली आहे.
आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या आवाहनात म्हणले की, बांग्लादेशातील हिंदू माता भगिनी, मुली तथा बांधवांवर अत्याचार होतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे सगळं घडताना आपण गप्प बसायचं का? हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. या घटनांचा निषेध करण्यासाठी मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने
यासाठी सरकारने पावले उचलून उपाययोजना करावी. अन्यायाची झळ बसलेल्या हिंदू बांधव व त्यांच्या कुटुंबासाठी जे काही करणं शक्य आहे ते सरकारने करावं याकरिता मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा तथा ही यात्रा काढली जाणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे.