25.3 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

झी नाट्य गौरव पुरस्कारावर सिंधुदुर्गची मोहोर.

- Advertisement -
- Advertisement -

सुनील हरिश्चंद्र उत्कृष्ठ दिग्दर्शक तर निहारिका राजदत्त उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराची मानकरी.

मसुरे | प्रतिनिधी : नाट्यसृष्ठिमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरणय झाले. उर्मिलायन या व्यावसाईक रंगभूमीवरील गाजत असलेल्या नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील कुसबे गावच्या सुनील हरिश्चंद्र यांना तर त्यांची पत्नी निहारिका राजदत्त यांची याच नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निहारिका राजदत्त यांचे माहेर मसूरे देऊळवाडा येथे तर आजोळ मुणगे देवगड येथे आहे. झी गौरव मध्ये या नाटकाला एकूण ११ पुरस्कारपैकी ८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या पुरस्काराबद्दल निहारिका राजदत्त म्हणाल्या, पहिलं व्यावसायिक नाटक आणि पहिलाच झी गौरव पुरस्कार माझ्यासाठी खास आहे.
उघड्या डोळ्यांनी बघितलेलं १७ वर्ष उराशी बाळगून ठेवलेलं हे स्वप्न सत्यात उतरलं. उर्मिलायन नाटकाने मला आयुष्यात खूप काही दिलं. ज्युरी विशेष झी गौरव अभिनेत्री पुरस्कार” त्यातलं एक आहे. स्पेशल ज्यूरी अवॉर्डच एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण होत. आजवर स्मिता पाटील, शबाना आझमी, मनिषा कोयराला, कोंकना सेन, इरफान खान, मनोज वाजपयी, नवाझुद्दीन यां सारख्या अनेक मातब्बर कलाकारांना ज्युरी अवॉर्ड मिळाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराला वेगळे महत्व आहे. आपलं काम परिक्षकांनी ध्यानी आणि मनी ठेऊन त्याच कौतुक करणे, पुरस्कारांमधे त्याला विशेष एक दर्जा दिला आहे हेच खूप भारी आहे.

निहारिका यांचे पती सुनिल हरिश्चंद्र हे कुसबे, कुडाळ येथील मूळ रहिवासी आषून गेल्या २६ वर्षापासून नाट्यसृष्टीत सातत्याने ते कार्यरत आहेत.

झी गौरव पाठोपाठ म. टा. सन्मान पुरस्कार मधे सुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक हि नामांकन जाहीर झाले आहे. निहारिका राजदत्त तांबे ही मसूरे गावचे सुपुत्र पदवीधर शिक्षक तथा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे व शिक्षक सुगंध तांबे यांची पुतणी तर सामाजिक कार्यकर्ते वी. रा. तांबे यांची नात आहे. दोघांच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुनील हरिश्चंद्र उत्कृष्ठ दिग्दर्शक तर निहारिका राजदत्त उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराची मानकरी.

मसुरे | प्रतिनिधी : नाट्यसृष्ठिमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरणय झाले. उर्मिलायन या व्यावसाईक रंगभूमीवरील गाजत असलेल्या नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील कुसबे गावच्या सुनील हरिश्चंद्र यांना तर त्यांची पत्नी निहारिका राजदत्त यांची याच नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निहारिका राजदत्त यांचे माहेर मसूरे देऊळवाडा येथे तर आजोळ मुणगे देवगड येथे आहे. झी गौरव मध्ये या नाटकाला एकूण ११ पुरस्कारपैकी ८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या पुरस्काराबद्दल निहारिका राजदत्त म्हणाल्या, पहिलं व्यावसायिक नाटक आणि पहिलाच झी गौरव पुरस्कार माझ्यासाठी खास आहे.
उघड्या डोळ्यांनी बघितलेलं १७ वर्ष उराशी बाळगून ठेवलेलं हे स्वप्न सत्यात उतरलं. उर्मिलायन नाटकाने मला आयुष्यात खूप काही दिलं. ज्युरी विशेष झी गौरव अभिनेत्री पुरस्कार" त्यातलं एक आहे. स्पेशल ज्यूरी अवॉर्डच एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण होत. आजवर स्मिता पाटील, शबाना आझमी, मनिषा कोयराला, कोंकना सेन, इरफान खान, मनोज वाजपयी, नवाझुद्दीन यां सारख्या अनेक मातब्बर कलाकारांना ज्युरी अवॉर्ड मिळाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराला वेगळे महत्व आहे. आपलं काम परिक्षकांनी ध्यानी आणि मनी ठेऊन त्याच कौतुक करणे, पुरस्कारांमधे त्याला विशेष एक दर्जा दिला आहे हेच खूप भारी आहे.

निहारिका यांचे पती सुनिल हरिश्चंद्र हे कुसबे, कुडाळ येथील मूळ रहिवासी आषून गेल्या २६ वर्षापासून नाट्यसृष्टीत सातत्याने ते कार्यरत आहेत.

झी गौरव पाठोपाठ म. टा. सन्मान पुरस्कार मधे सुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक हि नामांकन जाहीर झाले आहे. निहारिका राजदत्त तांबे ही मसूरे गावचे सुपुत्र पदवीधर शिक्षक तथा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे व शिक्षक सुगंध तांबे यांची पुतणी तर सामाजिक कार्यकर्ते वी. रा. तांबे यांची नात आहे. दोघांच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.

error: Content is protected !!